शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

३६ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ८७ लिटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:33 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (अंगठ्याजवळील बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या तीन लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यांतील १० हजार ४३५ बाटल्या कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील आठ हजार ६८१ बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून, येथील ३६ लाख ४६ हजार ९०८ मतदारांच्यातर्जनीवर ८६.८१ लिटर शाई लागणार आहे.जसजशी मतदानाची २३ एप्रिल तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर जांभळट निळी शाई लावण्यात येते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार व २१४८ मतदान केंदे्र आहेत. तसेच हातकणंगले मतदारसंघात १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार व १८५६ केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते.या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर जांभळट निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचे प्रमाण जास्त लागत आहे.कोणत्या बोटावर लागते शाईमतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. नंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. याआधीच तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.म्हैसूरची शाईसंपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीतून जगातील२५ देशांना निवडणुकीच्या शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी या शाईची ख्याती आहे.