शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ८४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने, चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी ...

कोल्हापूर : जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने, चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड पहावयास मिळाली. त्यातून अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली असून, काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. सर्वाधिक ९० टक्के मतदान कागल तालुक्यात झाले, तर शाहूवाडी तालुक्यातील पेरीडमध्ये बिनविरोधाची परंपरा खंडित होते म्हणून उमेदवारांसह मतदारांनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने एकही मतदान झाले नाही.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. माघारीनंतर ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. स्थानिक गटातटाची प्रतिष्ठा पणाला लागल्याने अनेक गावांत तणावपूर्ण मतदान प्रक्रिया झाली. त्यामुळे सकाळी ७.३०पासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. सकाळी लवकर मतदान करून शेतीच्या कामाला जायचे म्हणून मतदार लवकर घराबाहेर पडला होता. त्यामुळे सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०९ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३०पर्यंत ३६.१२ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाची गती वाढत जाऊन दुपारी दीडपर्यंत ५७.७० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३०पर्यंत तब्बल ७३.२२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३०पर्यंत ८३.८० टक्के मतदान झाले.

चिन्हांप्रमाणे वस्तूंचे वाटप

निवडणूक चिन्ह असलेल्या वस्तूंचे वाटप अनेक गावांत झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये छत्री, कप-बशी, शिट्ट्यांचे वाटप झाले, तर काही उमेदवारांनी संक्रांतीच्या सणासाठी आवश्यक आटा, गूळ, डाळ, आदी साहित्य घरपोच करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

चौकट

तालुकानिहाय मतदान

तालुका एकूण झालेले मतदान टक्के

शाहूवाडी ३४०१९ ७४.४६

पन्हाळा ७५१६१ ८२.२७

हातकणंगले ८२६०५ ८२.५१

शिरोळ १२३०६६ ८३.७२

करवीर ११२५७४ ८८.२३

गगनबावडा ७६०६ ८५.५१

राधानगरी १८७०२ ७६.९८

कागल ९९९५४ ९०.०९

भुदरगड ३६७७२ ८३.५९

आजरा २३०४७ ८२

गडहिंग्लज ६५२५० ८०.११

चंदगड ४०५५० ८२.९४

एकूण ७१९३०६ ८३.८०