शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

८० टक्क्यांचे ‘गणित’च फसवे

By admin | Updated: December 16, 2015 00:07 IST

‘एफआरपी’चे त्रांगडे : कारखानदार, संघटनेमध्ये टनास १५० रुपयांचा फरक; शुक्रवारी आयुक्तांची बैठक

विश्वास पाटील-- कोल्हापूर -साखर कारखानदार व संघटनेमध्ये नेमके कशाच्या आधारे ८० टक्के रक्कम द्यावयाची यावरूनही वाद आहे. त्यामुळेच या दोघांच्या रकमेमध्ये टनास सरासरी १५० रुपयांचा फरक पडतो आहे. कारखानदार म्हणतात तसा हिशेब केल्यास शेतकऱ्यांना १५० रुपये कमी मिळतात. त्याला संघटना तयार नाही. त्यामुळेच यंदाचे आंदोलन हंगाम सुरू होऊन दीड महिना झाल्यावर पेटले आहे.कारखानदारीच्या मते, मूळ एफआरपी जी सरासरी ३०७० हजार आहे, तिच्या ८० टक्के रक्कम काढून त्यातून ५५० रुपये तोडणी-ओढणी वाहतुकीचा खर्च वजा करावा. त्या रकमेतून पुन्हा ४५ रुपये शासन देणार असल्याने ही रक्कम वजा करावी व उर्वरित रक्कम द्यावी. ती १८६१ रुपये येते.संघटनेच्या मते, एफआरपीची मूळ रक्कम म्हणजे सरासरी ३०७० मधून ५५० रुपये वजा करावेत. ही रक्कम २५२० रुपये येते. त्याच्या ८० टक्के २०१६ रुपये येतात. तेवढी रक्कम कारखान्यांनी दिली पाहिजे. या दोन्हींतील फरक टनास १५५ रुपये येतो. सुरुवातीला साखरेचे दर वाढेपर्यंत एवढी रक्कम आम्ही देतो. एकदा दर वाढले की उर्वरित रक्कम देण्यास कारखानदारी बांधील आहेच, असे कारखानदारीचे म्हणणे आहे; परंतु त्यास खासदार राजू शेट्टी यांचा विरोध आहे. आम्ही अगोदरच शंभर टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर तडजोड केली आहे. आता त्यात आणखी आकड्याचे गणित करून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याची आमची तयारी नाही, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.दरम्यान, राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक येत्या शुक्रवारी (दि. १८) पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात सकाळी अकरा वाजता होत आहे. बैठकीस उपस्थित राहण्यासंबंधीच्या सूचना मंगळवारी सर्व कारखान्यांना देण्यात आल्या. साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याप्रमाणे कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी दिलीच पाहिजे, हे बजावून सांगण्यासाठीच ही बैठक आयोजित केली आहे.बँकेच्या उचलीचा दर अजूनही टनास २३८५ आहे. त्यामुळे ऊसासाठी उपलब्ध होणारी रक्कम १२७५ इतकीच आहे. अशा स्थितीत संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे देय रकमेच्या ८० टक्के रक्कम देण्यास अडचणीचे आहे. त्याऐवजी मूळ एफआरपीच्या (तोडणी - ओढणीसह) ८० रक्कम देऊन त्यातून तोडणी-ओढणी खर्च वजा केल्यास कारखान्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो. अंतिमत: ही रक्कम कारखान्यांना द्यावीच लागणार आहे. पण त्यासाठी थोडा अवधी मिळतो. भविष्यात बँकेच्या उचलीचा दर वाढल्यास ते शक्य होईल. या दोन्ही भूमिकांतून आयुक्त कोणता मध्य काढतात याबद्दल उत्सुकता आहे.नागपूरला गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एफआरपी देण्यासाठी ८०:२० चा तोडगा निश्चित झाला; परंतु राज्य साखर संघाने त्यास सहमती दिलेली नाही. त्यामुळे साखर कारखानदार १७०० रुपयांपर्यंतच एफआरपी देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून ‘स्वाभिमानी’ने आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी (दि. १४) जवाहर कारखान्याच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकले. मंगळवारी रांगोळी (ता. हातकणंगले) परिसरात त्याच कारखान्यास निघालेली तीनशे वाहने अडवली.कारखानदारीच्या मते, मूळ एफआरपी ३०७० रुपयांतून ८० टक्के रक्कम काढून त्यातून ५५० रुपये तोडणी-ओढणी खर्च वजा करावा. त्या रकमेतून ४५ रुपये शासनाचे वजा करावे, ती रक्कम १८६१ रुपये.संघटनेच्या मते, ३०७० मधून ५५० रुपये वजा करावेत. ही रक्कम २५२० रुपये येते. त्याच्या ८० टक्के २०१६ रुपये.