शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

७५७ अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: May 22, 2015 00:08 IST

जिल्ह्यातील २० जणांचा समावेश : सेवा खंडित करण्याचा शासन निर्णय; नोकरीसाठी भटकंतीची वेळ येणार

कोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या संपूर्ण राज्यातील ७५७ पंचायत व गट अभियंत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शासनाने मंगळवारी (दि. १९) अचानक त्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. परिणामी, संबंधित अभियंते हवालदिल झाले आहेत. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाने कंत्राटी पद्धतीने तालुका पातळीवर गट अभियंता आणि पंचायत स्तरावर पंचायत अभियंता यांची नियुक्ती केली. ग्रामविकास निधी, तेरावा वित्त आयोग निधी, पर्यावरण संतुलित समृद्धी योजना, केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजना यातून गावागावांत होणाऱ्या कामांत तांत्रिक देखभाल करणे, कामे दर्जेदार करून घेणे अशी जबाबदारी या अभियंत्यांवर आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी राज्यात ७५७ कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्वच अभियंते सेवेत आहेत. पंचायत अभियंत्याला दरमहा १६ हजार, तर गट अभियंत्याला १८ हजार मानधनही दिले जाते. (प्रतिनिधी)कालावधी संपण्याआधीच सेवा संपुष्टातअनेक अभियंत्यांनी विविध खासगी कंपन्यांतील नोकरी सोडली आणि अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र, कंत्राटी पद्धतीचा ११ महिन्यांचा कालावधी संपण्याआधीच म्हणजे मे २०१५ अखेर सेवा संपुष्टात आणावी, असा आदेश शासनाचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी काढला आहे. परिणामी संबंधित अभियंत्यांना पुन्हा नोकरीसाठी भटकंती करावी लागणार आहे.शासनाने परीक्षा घेऊन आमची नेमणूक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १६ पंचायत, तर चार गट अभियंते कार्यरत आहेत. शासनाने अचानक सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. सेवेत कायम ठेवावे. - किरण परीट, पंचायत अभियंता, शिरोळ