शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या संपामुळे ७५० कोटींचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : मोदी सरकारने ‘आयडीबीआय’ आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर ...

कोल्हापूर : मोदी सरकारने ‘आयडीबीआय’ आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने बँका बंद राहिल्या. क्लिअरिंग, कॅश बंद राहिल्यामुळे दिवसभरात सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, सकाळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात बँक कर्मचाऱ्यांनी मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध केला.

देशातील १२ सार्वजनिक क्षेत्रातील, १२ जुन्या जमान्यातील खासगी, ६ विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे इत्यादी कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी शाखेच्या दारात मूक निदर्शने केली. लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर सर्व कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे तोटे सांगणाऱ्या माहिती पत्रकाचे वाटप परिसरात केले. यावेळी विकास देसाई, रमेश कांबळे, सुहास शिंदे, प्रमोद शिंदे, चंद्रकांत गुडस्कर, विवेककुमार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

बँकांचा संप १०० टक्के यशस्वी झाला. राज्यात १० हजार शाखांचे शटरही उघडले नाही. कॅश, क्लिअरिंग ठप्प होते. कोरोनामुळे मेळावे, धरणे, मोर्चा, आंदोलन करता आले नसले तरी प्रत्येक शाखेतील ५ कर्मचाऱ्यांच्या गटाने परिसरातील भाजी मंडई, बाजारपेठेत जाऊन बँक खासगीकरणाचे तोटे काय आहेत, याच्या माहितीपत्रकाचे वाटप केले. मंगळवारीही अशाच प्रकारे आंदोलन राहील. पुढील आठवड्यात युनायटेड फोरमची मीटिंग होणार असून, पुढील आंदोलन तीव्र करण्याबाबत रणनीती ठरविली जाईल.

देवीदास तुळजापूरकर, निमंत्रक युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन

चौकट

संप सरकारी बँकांचा; परिणाम सहकारी बँकांवर

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाचा सहकारी बँकांनाही फटका बसला. क्लिअरिंग, आरटीजीएस सेवेसह सर्व ऑनलाइन व्यवहारांवर परिणाम झाला. वसुलीला गेल्यावर काही कर्जदारांनी राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर पैसे असल्याची कारणे पुढे केली.

चौकट

देशात संपात सहभागी बँका : १७०

देशात सहभागी कर्मचारी : १० लाख

राज्यात बँकांच्या शाखा बंद : १० हजार

राज्यात सहभागी कर्मचारी : सुमारे ५० हजार

कोल्हापूर जिल्ह्यातील सहभागी शाखा : १५० पेक्षा जास्त

कर्मचारी : ५ हजार

फोटो : १५०३२०२१ कोल बँक न्यूज१`

फोटो : १५०३२०२१ कोल बँक न्यूज २

ओळी : कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभाग नोंदविला. सोमवारी बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी येथील शाखेसमोर मूक निदर्शने केली.

छाया : आदित्य वेल्हाळ