शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलीवर अत्याचार करणा-या 74 वर्षीय वृध्दाला तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 16:18 IST

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी शुक्रवारी वृध्दास पाच वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावला.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 30-  शिवाजीनगर, कणेरीवाडी येथील पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी शुक्रवारी वृध्दास पाच वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावला. आरोपी गोविंद बाळू घाडगे (वय ७४) असे त्याचे नाव आहे. 
पीडीत मुलींचे कुटूंबिय व आरोपी गोविंद घाडगे हे शेजारी राहतात. दि. १८ मार्च २०१४ रोजी दूपारी तीनच्या सुमारास या दोन मुली शाळेतून आल्यावर आत्याच्या घरासमोर खेळत होत्या. यावेळी घाडगे हा एकटाच घरी होता. त्याच्या नजरेस या दोन मुली खेळत असल्याचे दिसले. त्याने दोघींना आपल्या घरी बोलवून घेतले. माडीवर नेवून पोटमाळ्यावरील दोरी काढण्याचा बहाणा करीत त्याने दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 
त्यातील एक मुलगी आईला सांगतो म्हणून पळत घरी आली. तर दूसरीला त्याने धरुन ठेवत मारहाण करीत कोणाला  सांगू नको असे सांगितले. त्यामुळे ती तिथेच रडत बसली. पहिली मुलगी रडत घरी आल्याने तिच्या आईने विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. तिच्यासह आई व अन्य नातेवाईक घाडगेच्या घरी गेले असता त्याने मी काहीही केले नसल्याचा कांगावा केला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी आरोपी घाडगे याला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही मुलीचा जबाब, शेजारी, मुलींची आई, आत्या यांचे जबाब महत्वाचे ठरले. आरोपीच्या दंडाची रक्कम दोन्ही मुलींच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.