शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७० हजार हेक्टर उसावर ‘तांबेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:56 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेल्या एकसारख्या पावसाने ऊस पीक पूर्णपणे आकसले आहे. त्यात तांबेराने झडप घातल्याने उसाची वाढच खुंटली आहे. जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक हेक्टरवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादन घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस पिकाची वाढ उन्हात झपाट्याने होते; त्यामुळे जूननंतर पावसाची उघडझाप राहिली, तर वाढ चांगली होऊन उसाचा उतारा चांगला मिळतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जास्त असला, तरी उघडझाप असायची; पण यंदा गेले सव्वा दोन महिने एकसारखा पाऊस आहे; त्यामुळे जमिनीला वापसा मिळत नाही, याचा परिणाम सर्वच खरीप पिकांवर झाला आहे. या हवामानाचा सर्वाधिक फटका उसाला बसला आहे. उसाच्या सऱ्यांतील पाणी कमी होत नसल्याने वाढ खुंटली आहे. त्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाची तीव्रता इतकी प्रचंड आहे, की अखंड उसाचा प्लॉटच तांबडाभडक दिसत आहे. उसाच्या पानाखाली बघितले की तांबूस रंगाच्या पावडरीचा थर आपणास पाहावयास मिळतो. ‘तांबेरा’ पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने खोडाची ताकद कमी होते. सध्या पानांतून खोडात साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावेळीच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने वाढीबरोबरच उताराही घटणार आहे.हंगाम दोन महिन्यांवर आला आहे; त्यामुळे आता उसाची उंची फार वाढणार नाही. आता साखर तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.पावसाचा जोर आणि शेतकºयांना घोरसाधारणत: आपल्याकडे १ आॅगस्टपासून उसाच्या आडसाल लावणी सुरू होतात. आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने लावणीच्या उगवणीस मदत होते; पण सध्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकºयांचा घोर वाढला आहे. लावण केलेल्या उसाचे बियाणे पाण्याखाली गेले, तर कुजण्याची भीती असते.हे करावे शेतकºयांनी :‘दायथेनिअम-४५’ पावडर ३० ग्रॅम त्यात १९ : १९ : १९ खत ७५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी. उसात फवारणी करताना सगळे औषध अंगावरच पडते, यासाठी खांद्यावर झेंडा घेतल्यासारखा पंपाचा नोजल घेऊन फवारणी करीत सरीतून पुढे सरकत गेल्यास औषधाची फवारणी पानावर होते. अरुंद सरी आणि गच्च पाल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होतो, यासाठी उसाची लावण करतानाच मोठी सरी सोडावी व उसाला पाला सुटतो, त्यावेळी पाला काढून सरी मोकळी ठेवल्यास हवा खेळती राहते.