शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीसह सर्वच प्रकल्पांत ७० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

आजरा : आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. चित्री, एरंडोळ, खानापूर, धनगरवाडी धरणात सरासरी ७० टक्के पाणी शिल्लक ...

आजरा : आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. चित्री, एरंडोळ, खानापूर, धनगरवाडी धरणात सरासरी ७० टक्के पाणी शिल्लक आहे. चित्री प्रकल्पातून १२ मार्चपासून पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू आहे. शिल्लक पाणीसाठा व वेळेवर आवर्तन सुरू असल्याने चालूवर्षी पाणीटंचाई भासणार नाही.

आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री प्रकल्प चालूवर्षी तुडुंब भरला आहे. चित्री प्रकल्पामुळे आजऱ्यातील ६१४, तर गडहिंग्लजमधील ८१३६ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चित्रीसह, एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर प्रकल्पांमुळे १३ हजार ८५ हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. चित्रीमुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना हिरण्यकेशी नदीवरून झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांत पाणीटंचाईच्या झळा कमी बसत आहेत.

चित्री प्रकल्पात १८८८ पैकी १२६६ द.ल.घ.फू. म्हणजे ६७ टक्के, एरंडोळमध्ये ८२ टक्के, खानापूर ७८ टक्के, तर धनगरवाडी ७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. जूनमध्ये पावसाला सुरुवात होते. चालूवर्षी पाऊस डिसेंबरअखेर सुरू होता, तर वळवाचा पाऊस, जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही झाला आहे. याचा लाभ पिकांना मिळाला आहे. सर्वच धरणांतून समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

---------------------------------------

दररोज २ मेगावॅट विजेची निर्मिती

चित्रीच्या पाण्यावर वीजनिर्मिती सुरू

चित्री धरणाच्या गेटमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर दररोज २ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे. १२ मार्चपासून चालू वर्षातील दुसऱ्यांदा पाणी सोडले जात आहे. गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळपर्यंत चित्रीचे लाभक्षेत्र असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी गोटूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडले जाते.

---------------------------------------

* फोटो ओळी : चित्री प्रकल्पात ६७ टक्के पाणी असताना दिसणारे विहंगम दृश्य.

क्रमांक : २१०३२०२१-गड-०४