शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

६९ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: September 4, 2015 00:48 IST

घरफाळा गैरव्यवहार प्रकरण : सात अधिकाऱ्यांचाही समावेश; आयुक्तांचा दणका

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाकडील घरफाळ्याच्या थकीत रकमेवरील दंडामध्ये मिळकतधारकांना अनाधिकाराने सूट देणाऱ्या ‘दानशूर’ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमध्ये सात अधिकाऱ्यांसह ६९ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या प्रत्येकी एक ते तीन वेतनवाढी कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचा पालिकेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली.महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या ताराराणी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एका व्यापारी व निवासी वापरातील मिळकतीचा घरफाळा व त्यावरील दंडव्याज माफ केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली होती. या प्रकारात अधिकाऱ्यांनी २२ लाख घरफाळ्याची थकबाकी १४ लाख भरून घेत उर्वरित दंडाची रक्कम माफ केली होती.त्यामुळे आयुक्तांनी घरफाळा विभागाचे अधीक्षक दिवाकर कारंडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून दंडव्याज माफ करण्याच्या अशा घटना घडल्या आहेत का, याची चौकशी सुरू केली. गेल्या चार महिन्यांपासून ही चौकशी सुरू होती. सन २०१० ते २०१४ अशा चार वर्षांत कोणी कोणी, किती दंडव्याज माफ केले आणि त्याची रक्कम किती होते, या अनुषंगाने ही चौकशी झाली. चार वर्षांत तब्बल २ कोटी ९१ लाख ९३ हजार ५४० रुपयांचे दंडव्याज माफ करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याची गंभीर बाब चौकशीत समोर आली. त्याला प्रामुख्याने दिवाकर कारंडे, संजय भोसले, दिलीप कोळी, दीपक टिकेकर, सुरेश माने, दीपक सोळंकी, विश्वास कांबळे हे सात अधिकारी व ६९ कर्मचारी जबाबदार असल्याची बाबही स्पष्ट झाली. महानगरपालिकेच्या इतिहासात एवढ्या कर्मचाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे घोटाळेबाज कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी मनांवर घेतले तर घोटाळेबाजांना कसे वठणीवर आणता येते याचेही प्रत्यंतर त्यातून आले आहे. (प्रतिनिधी) एक वार्षिक वेतनवाढ कायमपणे बंद (नावापुढे सूट दिलेली रक्कम)१) शंकर कोळी : ४ लाख ९८ हजार ६३७२) राजेंद्र वरके : ४ लाख ८९ हजार ६७६३) डी. एच. पाटील : ४ लाख ८७ हजार ६२४४) शिवानंद वडणगेकर : ३ लाख ९७ हजार २६७५) धनंजय माने : ३ लाख ६६ हजार ३०८६) शिवाजी मोहिते : ३ लाख ६१ हजार ३६७) प्रकाश आयरे : ३ लाख ५८ हजार ६६५८) संदीप कांबळे : ३ लाख ५६ हजार २०७९) अरुण भोसले : ३ लाख ३५ हजार ८७५१०) राजेंद्र दळवी : ३ लाख २८ हजार २८१११) संतोष पोवार : २ लाख २२ हजार २३९१२) रवींद्र साळोखे : ३ लाख २० हजार ११११३) विक्रम पोवार : २ लाख ८४ हजार ४८९१४) संजय पोवार : २ लाख ८३ हजार ३६०१५) निशिकांत सरनाईक : २ लाख ६७ हजार ८३६१६) प्रवीण भोसले : २ लाख ६५ हजार २३४१७) सदाशिव पाटोळे : २ लाख ३७ हजार ९४७१८) विश्वास पाटील : २ लाख ३४ हजार ३८१९) भीमराव चौगले :२ लाख १० हजार ७१९२०) राजेंद्र जाधव : १ लाख ९१ हजार ९५१२१) सचिन इंगवले : १ लाख ५७ हजार ९२२२) विश्वनाथ भोजे : १ लाख ४४ हजार ८७२३) सुरेश जाधव : १ लाख ४१ हजार ५१५२४) आनंद रुईकर : १ लाख ४१ हजार २२१२५) संजय बोंद्रे : १ लाख १७ हजार २८४२६) विशाल पंडत : १ लाख ११ हजार ७२०२७) अनिल अडिवाल : १ लाख ०९ हजार ५१२८) रमेश कांबळे : १ लाख ०७ हजार ६५५२९) चंद्रकांत भोसले : १ लाख ०७ हजार ५६७३०) सूर्यकुमार ढाले : १ लाख १ हजार ६५३१) गणेश लोखंडे : ९७ हजार ७०३२) सुरेश माने : ८५ हजार १७१३३) संदीप लकडे : ८१ हजार १९८३४) अनिल लाड : ७३ हजार ५०८३५) दिलीप दळवी : ६५ हजार १७७३६) शांताराम पोवार : ५९ हजार ४९५३७) रमेश देसाई : ५७ हजार ५०९