शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्ह्यात ६६ गावे डोंगरकड्यांखाली

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

लोकवस्ती धोक्यात : आणखी एक ‘माळीण’ होण्याची भीती

कोल्हापूर : आपल्या आजूबाजूला किती धोके असतात, याची कल्पना आपणाला एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच समजते. गतवर्षी डोंगर कोसळल्यामुळे माळीण गाव अक्षरश: ‘होत्याचं नव्हतं’ झालं; परंतु अशा प्रकारचा धोका पुन्हा उद्भवू शकतो, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत तब्बल ६६ गावे आहेत. डोंगरकड्यांखाली वास्तव्य असलेल्या धोकादायक गावांचे सर्वेक्षण झालेले असले तरी हा धोका किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. गतवर्षी पुणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यानंतर डोंगर कोसळून संपूर्ण माळीण गाव गाडले गेले, मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर डोंगरकड्यांखाली धोकादायक स्थितीत असणाऱ्या गावांचा शोध घ्या आणि पर्यायी व्यवस्था करा, असे आदेश मंत्रालय पातळीवर झाले. त्यानुसार कोल्हापुरात तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी तालुकास्तरावर तहसीलदारांना सूचना देऊन कोल्हापूर जिल्ह्यात अशी डोंगरकड्यांखाली वास्तव्य असलेली गावे, वाड्यांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल निरीक्षक, तलाठी या सर्वांनी प्रत्येक गावात जाऊन डोंगरकड्यांच्या खाली असलेल्या गावांचा सर्व्हे केला. त्यांना दिलेल्या सूचनेनुसार जे गाव डोंगरकड्याखाली दिसते, त्याची त्यांनी दखल घेतली. त्यांची मोजदाद करून आकडेवारी आपल्या अहवालासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिली. सोबत त्यांनी घरांची संख्या, कुटुंबांची संख्या, लोकसंख्या, पशुपक्ष्यांची संख्या यांचीही मोजदाद केली आहे; परंतु, गावे डोंगरकड्याखाली असूनही त्यांना धोका कसा व किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ५५ गावे धोकादायक ठिकाणी वसली आहेत.जिल्ह्यात जी ६६ गावे डोंगरकड्यांखाली वसलेली आहेत, ती डोंगरकड्याची जमीन कशी आहे हे ठरविण्याइतपत तहसीलदार दर्जाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे गावांचे सर्वेक्षण झाले असले तरी त्या गावांच्या धोक्याचे अनुमान काढण्यात आलेले नाही. कागल, शिरोळ, करवीर, हातकणंगले, चंदगड, गगनबावडा, आजरा या तालुक्यांमध्ये भूस्खलनाची अजिबात शक्यता नाही. मात्र, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक, भुदरगड तालुक्यातील चिंचेवाडी गाव सामानगडाच्या पायथ्याशी असून, या तालुक्यात आठ गावे, तर राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक ५५ गावे धोकादायक स्थितीत आहेत.जिल्ह्यात डोंगरपायथ्याशी व डोंगरकड्याखाली वास्तव्यास असणाऱ्या ४६ हजार ४०७ लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ६६ गावे धोक्याच्या पातळीत असतील तर प्रत्यक्ष त्यांचा धोका किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करून तातडीने पर्यायी व्यवस्था, उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे; परंतु गेल्या वर्षभरात नेमक्या याच गोष्टीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. धोकादायक गावांचे सर्वेक्षण झाले; परंतु त्यांच्यावरील धोक्याची तीव्रता स्पष्ट न झाल्याने या सर्व गावांतील ग्रामस्थ आपला जीव डोंगरकड्यांच्या हवाली करूनच आजही जीवन जगत आहेत. लवकरच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरकड्यांचाही तातडीने तज्ज्ञांकडून अभ्यास करून ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्या तर संभाव्य दुर्घटना आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी टाळली जाऊ शकते. धोकादायक गावे तालुकागावेघरांची संख्या १. राधानगरी५५१०,२८३२. पन्हाळा१उपलब्ध नाही३. शाहूवाडी१०८४. भुदरगड८३६३५. गडहिंग्लज१२२५