शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

बनावट सोने तारण ठेवून बँकेला ६५ लाखांचा गंडा

By admin | Updated: April 15, 2015 00:46 IST

सराफासह तेरा ग्राहकांवर फसवणुकीचा गुन्हा

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून सुमारे ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज उचलून अ‍ॅक्सिस बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सराफ शरद लक्ष्मण नागवेकर (रा. ब्रह्मेश्वर बाग, शिवाजी पेठ) याच्यासह १३ ग्राहकांवर मंगळवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले, राजारामपुरी येथील साईक्स एक्स्टेंशनमध्ये अ‍ॅक्सिस बँकेची शाखा आहे. या बँकेच्यावतीने रघुनाथ एस. दिंडोरकर अँड सन्सतर्फे सराफ शरद लक्ष्मण नागवेकर यांना सोने तपासणीचे अधिकार दिले आहेत. नागवेकर याने २०१३ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंत बँकेत १३ ग्राहकांकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे दाखवून त्यांना प्रमाणपत्र दिले. त्याआधारे त्यानी बँकेकडून ६५ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या व्यवहाराची तपासणी करताना त्यामध्ये बनावट सोने आढळून आले. यामुळे बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापक घनशाम मोहनलाल चांडक (वय ३४, रा. न्यू पॅलेस) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सराफ शरद नागवेकर, ग्राहक आशा अशोक दारेकर, माणिक नामदेव मोहिते, हंबीरराव विष्णू सुर्वे, अंजना जगन्नाथ रकटे, नितीन दिलीप वंशे, संतोष बापू गोंधळी, रमेश जयसिंग जाधव, नीता रवींद्र जाधव, छाया किसन वासुदेव, अमोल विजय गवळी, सुमन सखाराम चौगले, सुमन श्रीकांत डांगे, बाबासाहेब दत्तात्रय पाटील, आदींच्या विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत. (प्रतिनिधी)