गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४५ ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी सोमवारी माघारी झाल्या. वासणोली, पाचर्डे, मुरूकटे, पाटगाववगळता इतर ४१ गावांत निवडणुका होणार आहेत. आज मौनी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात माघारींची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी आडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत ११४२ इच्छुकांनी १३२० अर्ज दाखल केले.त्यापैकी आठ अर्ज बाद झाले होते. ३४१ जागांकरिता १३६ प्रभागांत ६४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. क्वचित ठिकाणी तिरंगी अन्यथा सगळीकडे दुरंगी लढत होणार आहे. पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्या केल्याने चित्रविचित्र आघाड्या निर्माण झाल्या आहेत.
..........
एकूण मतदारसंख्या ४७००६
एकूण १३६ प्रभाग
एकूण सदस्यसंख्या ३४१
अर्ज दाखल संख्या १३२०
रिंगणात उमेदवार ६४९