शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत निवडणुकीचे ६३ लाख थकीत

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

ग्रामविकास विभागाचा कारभार : देणेकऱ्यांना प्रतीक्षा, उधारीचा व्यवहार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -ग्रामपंचायतींच्या गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चापोटी जिल्ह्यातील ६३ लाख रुपये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून थकीत आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासन (महसूल) वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाच वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने देणेकऱ्यांना पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न तालुका महसूल प्रशासनासमोर आहे. नुकत्याच जाहीर ग्रामपंचायतीसाठी लागणारी स्टेशनरी व अन्य साहित्य खरेदीसाठी संबंधितांकडे गेल्यानंतर ‘मागच्या निवडणुकीतील उधारी पहिल्यांदा द्या, मगच आमच्याकडे या’ असे उत्तर मिळत आहे. पाच वर्षांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया महसूल निवडणूक विभाग राबवत असते. प्रभाग रचनेपासून आरक्षण जाहीर करणे, निवडणूक घेऊन निकाल जाहीर करणे, विविध टप्प्यांत यंत्रणा काम करते. निवडणूक होईपर्यंत अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत अमर्याद तास काम करतात. तालुका कार्यालय आणि मतदान केंद्र येथे लागणारी स्टेशनरी, निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी प्रती ग्रामपंचायत २० हजार रुपयांची तरतूद केली. त्यानुसार खर्च मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यासाठी अद्याप निधी आलेला नाही. पुन्हा ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेने गेल्या निवडणुकीतील देय रक्कम द्यावी, आगामी निवडणुकीसाठी प्रती मतदार ४० हजार किंवा प्रत्येक केंद्रासाठी १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली. याच मागणीसाठी असहकार आंदोलन केले. त्याची गांभीर्याने नोंद निवडणूक विभागाने घेतली. निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध न केलेल्या तहसीलदारांवर कारवाईचा आदेश आयोगाने दिला आहे. मात्र, देय रक्कम न दिलेल्या ग्रामविकास विभागावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या प्रती ग्रामपंचायतींना ४ हजार १०० रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले आहे. यापुढील रक्कम किती आणि कधी मिळणार यासंबंधी स्पष्ट केलेले नाही. देय रक्कमही अदा केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. देणेबाकी न दिल्यामुळे महसूल यंत्रणेला या निवडणुकीत उधारी मिळणे बंद झाली आहे. पारदर्शकता येत असल्यामुळे खर्चाची रक्कम ‘अ‍ॅडजेस्ट’ कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाचा मुद्दा कळीचा झाला आहे.सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या खर्चापोटीच्या जिल्ह्यातील ६३ लाख निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे पण अजून निधी आलेला नाही. गेल्यावेळचा देय असल्याने यावेळी निवडणुकीसाठी स्टेशनरी व अन्य साहित्य उधारीवर कोणीही देत नसल्याच्या तक्रारी तालुका पातळीवरून येत आहेत.- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)असहकारामुळे ग्रामपंचायत अधिसूचना प्रसिद्ध न केलेल्या तहसीलदारांवर कारवाईचा आदेश आयोगाने काढला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी अधिसूचना वेळेत जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही तहसीलदारांवर कारवाई होणार नाही.