शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६१ बल्क कुलर्स उभारणार

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

दिलीप पाटील : धारवाड, बंगलोर येथून गाय-म्हैस खरेदीसाठी ‘गोकुळ’चे अनुदान

कोल्हापूर : दूध संकलनामध्ये वाढ व त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोकण व कर्नाटकातील काही भागांत क्लस्टर बल्क कुलर्स बसविण्यात आले आहेत. नॅशनल डेअरी प्लॅन अंतर्गत जिल्ह्यातील ४२ गावांत ६१ बल्क कुलर्सला मान्यता मिळाल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच धारवाड व बंगलोर येथून गाय, म्हैस खरेदी करणाऱ्या उत्पादकाला अनुदान सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पाटील म्हणाले, दूध उत्पादक व ग्राहक यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोकुळ’ने वाटचाल सुरू केली असून, बाजारपेठेत ‘गोकुळ’च्या दुधाची मागणी वाढली आहे; पण त्या पटीत संकलन वाढत नसल्याने बाहेरील जिल्ह्यातून दूध खरेदी करावे लागत आहे. सध्या सरासरी सात लाख ६० हजार लिटरचे संकलन होते. आगामी काळात मुक्त गोठा संकल्पनेस प्रोत्साहन देणार आहे. संघामार्फत गुजरात येथून म्हैस खरेदीसाठी आठ हजार, तर हरियाणासाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर धारवाड येथून म्हैस, गाय खरेदीसाठी चार हजार, तर बंगलोर येथून गाय खरेदीसाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू आहे. संकलन वाढीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वासरू संगोपन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सात कोटी ६१ लाख ४० हजार इतके अनुदान देण्यात आले असून, दुसऱ्या वेतासाठीही गायीसाठी एक हजार, तर म्हैशीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. गडहिंग्लज येथे एक्सरे मशीन बसविण्यात येणार असून, बोरवडे व कोल्हापूर येथेही एक्सरे मशीन बसविण्याचे विचाराधीन असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, दिनकरराव कांबळे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, उपमहाव्यवस्थापक आर. जी. पाटील, मोहन यादव उपस्थित होते. उत्पादकांना भरघोस दरवाढवाढती महागाई व दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी संघाने अहवाल सालात तीनवेळा म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ केली आहे. आतापर्यंत साडेचार रुपये प्रतिलिटर उत्पादकाला वाढ दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. भविष्यकालीन योजना४० हजार आदर्श उत्पादक तयार करणे.एन.डी.डी.बी.च्या साहाय्यातून राज्यात एकमेव चारा कारखाना उभारणे.‘गोकुळ’ची हाताळणी क्षमता सात लाख लिटर्सवरून १२ लाख लिटर्स करणे.सर्व शीतकरण केंद्रांवर मिनी प्रयोगशाळा चालू करणे.