शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यातील उसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. उसाअभावी साखर कारखाने फेब्रुवारी महिन्यातच बंद झाले होते. मात्र गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत असणाºया शेतकºयासमोर यंदा पुन्हा अपुºया पावसाने संकट उभे केले होते. काही अपवाद वगळता आॅगस्ट महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे तर पिकांनी माना टाकल्या होत्या. तर ऊस लागणीसह रब्बीचा हंगाम वाया जाणार अशी भिती व्यक्त असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्णात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकºयांना दिलास मिळाला. गेले आठ दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने विहिरी, नद्यांची पातळी काहीप्रमाणात वाढली आहे. धरणेही भरली आहेत. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून ऊन-पावसामुळे उसााची वाढ जोमात सुरू आहे.जिल्ह्यात सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो; पण आतापर्यंत १०७४.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६०.६२ टक्केच पाऊस पडला असून, हातकणंगले तालुक्यात ४४.९७ टक्के, राधानगरी तालुक्यात ४२.३० टक्के, गगनबावडा तालुक्यात अद्याप ४७.३६ टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत गगनबावडा तालुका एकदमच मागे राहिला असून, तिथे केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांनी सप्टेंबर महिन्याची सरासरी आताच ओलांडली आहे.दरम्यान, रविवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस आहे. त्यात जिल्ह्णातील सगळीच धरणे शंभर टक्के भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.तालुका सरासरी पाऊस आतापर्यंत झालेला पाऊसमिलिमीटर कंसात टक्केवारीहातकणंगले ८२०.४० ३६८.९१ (४४.९७ )शिरोळ ३८५.३० २६२.२१ (६८.०५)पन्हाळा १४१६.२० १०३९.३१ (७३.३९)शाहूवाडी १५४२.३० १५२१.०० (९८.६२)राधानगरी ३५०१.६० १४८१.२८ (४२.३०)गगनबावडा ५६२९.४० २६६६.०० (४७.३६)करवीर ७९६.९० ५५२.३२ (६९.३१)कागल ६४९.६० ७६२.९४ (११७.४५)गडहिंग्लज ७८४.६० ५१८.७९ (६६.१२)भुदरगड १३४३.७० १०७९.८० (८०.३६)आजरा १७८९.७० १२१२.०० (६७.७२)चंदगड २६०९.०० १४२९.०३ (५४.७७)