शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव मनपात ५५ नवे चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST

मनपा निवडणुकीत तीन वगळता ५५ जण पहिल्यांदा मनपा सभागृहात पाऊल ठेवणार आहेत, तर केवळ तीन नगरसेवक आपला जुना अनुभव ...

मनपा निवडणुकीत तीन वगळता ५५ जण पहिल्यांदा मनपा सभागृहात पाऊल ठेवणार आहेत, तर केवळ तीन नगरसेवक आपला जुना अनुभव घेऊन मनपात जातील. या वेळी बहुतांश नगरसेवक तरुण आहेत, त्यामुळे मनपात युवाराज होणार आहे.

बेळगाव महापालिकेत सातत्याने निवडून येणाऱ्यांची संख्या या वेळी अत्यंत कमी झाली असून, त्याऐवजी सर्वाधिक नवे चेहरे निवडून आले आहेत. महापालिकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी हे यश त्यांना पक्ष चिन्हामुळे नव्हे तर मराठी भाषिक उमेदवारांमुळेच मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत २२ मराठी आणि १४ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत, हे विशेष.

बेळगाव महापालिकेच्या या वेळच्या निवडणुकीप्रसंगी आरक्षणाबरोबरच अवैज्ञानिक प्रभाग पुनर्रचना याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. या फायद्याबरोबरच लोकसभा निवडणूक, तसेच अन्य राष्ट्रीय मुद्द्यांवर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या मनोवृत्ती लाभ भाजपला मिळाला आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ३५ उमेदवार विजयी झाले असते, तरी त्यापैकी 15 उमेदवार मराठी भाषिक आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रवी साळुंके, बसवराज मोदगेकर, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर हे उमेदवार विजयी झाले असले तरी मराठी भाषिक ज्योती कडोलकर या काँग्रेसतर्फे विजयी झाल्या आहेत. या व्यतिरिक्त पूजा पाटील व शंकर पाटील या अपक्ष उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.

महापालिकेच्या या वेळच्या निवडणुकीत कांही दाम्पत्याने देखील आपले नशीब आजमावले. विनायक गुंजेटकर (प्रभाग 29) व सायली गुंजेटकर (प्रभाग 52), मीना वाझ (प्रभाग 3) व रायमन वाझ (प्रभाग 4), मधुश्री पुजारी (प्रभाग 56) व आप्पासाहेब पुजारी (प्रभाग 41) ही दांपत्ये या वेळच्या निवडणूक रिंगणात उतरले होती. परंतु या तीनही दाम्पत्यांना पराभव पत्करावा लागला.