शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

‘गोकुळ’साठी ५४ जण रिंगणात

By admin | Updated: April 9, 2015 01:06 IST

१६७ जणांची माघार : अरुंधती घाटगे, चौगुले, दिनकर कांबळेंंना डच्चू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या उमेदवारी अर्ज माघारीच्या बुधवारी या शेवटच्या दिवशी १६७ जणांनी माघार घेतली. १८ जागांसाठी ५४ जण रिंगणात राहिले असून, दुरंगी लढत होणार आहे. सत्तारूढ पॅनलमधून विद्यमान संचालक अरुंधती घाटगे, बाबासाहेब चौगुले, दिनकर कांबळे यांना डच्चू मिळाला. पॅनल बांधणी करताना दोन्ही गटांनी कमालीची गुप्तता पाळल्याने शेवटपर्यंत इच्छुकांना अंदाज आला नाही. सत्तारूढ गटाचे पॅनल मंगळवारी रात्री निश्चित झाल्यानंतर नेत्यांनी आपल्या समर्थकांना माघारीसाठी संकेत दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरापासून कार्यकर्ते माघारीच्या रांगेत थांबले होते. सत्तारूढ गटाने दुपारी एक वाजता पॅनलची घोषणा केल्यानंतर माघारीसाठी झुंबड उडाली. दुपारी तीनपर्यंत १६७ जणांनी माघार घेतली. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी ४१, महिला गटातील दोन जागांसाठी ५, अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी दोन, तर भटक्या-विमुक्त व इतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी प्रत्येकी तीन अर्ज शिल्लक राहिले आहेत. २३ एप्रिलला मतदान होणार आहे. या दिग्गजांची माघारप्रकाश चव्हाण, सत्यजित जाधव, हिंंदुराव चौगले, धनाजी देसाई, दिनकर कांबळे, रामराजे कुपेकर, गणपतराव फराकटे, अजितसिंह घाटगे, सचिन घोरपडे, विद्याधर गुरबे, अरुण इंगवले, दौलतराव जाधव, पंडित केणे, किशाबापू किरुळकर, सुरेश कुराडे, हंबीरराव पाटील, ए. वाय. पाटील, के. एस. चौगुले, रघू पाटील (चिखलीकर), हंबीरराव वळके, पांडबा यादव. शिल्लक अर्ज असे -सर्वसाधारण गट : सरदार पाटील (आकुर्डे), उदय पाटील (सडोली खालसा), बाबासाहेब चौगले (केर्ली), अरुण डोंगळे (घोटवडे), चंद्रकांत बोंद्रे (फुलेवाडी), कृष्णात पाटील (वडकशिवाले), रवींद्र आपटे (उत्तूर), विजयसिंह मोरे (सरवडे), संग्राम पाटील (शिंगणापूर), सदानंद हत्तरकी (हलकर्णी), सत्यजित पाटील (सोनाळी), रघुनाथ घाटगे (कासारवाडी), किशोर पाटील (शिरोली दुमाला), अविनाश पाटील (राशिवडे), शशिकांत पाटील (चुये), धैर्यशील देसाई ( गंगापूर), बाजीराव पाटील (वडणगे), रणजितसिंह पाटील (मुरगूड), सुरेश पाटील (कसबा बीड), अरुण नरके (कसबा बोरगाव), दिलीपराव पाटील (शिरोळ), दीपक पाटील (बसर्गे), राऊसाहेब पाटील (वाकरे), अमरीशसिंह घाटगे (शेंडूर), सुरेशराव चव्हाण-पाटील (निट्टूर), बाबासाहेब शिंदे (शिंदेवाडी), वसंत खाडे (सांगरूळ), सदाशिवराव चरापले (कौलव), किरणसिंह पाटील (येवती), बाळासाहेब पाटील (दुंडगे), भूषण पाटील (वाळवे खुर्द), राजेश पाटील (म्हालेवाडी), मधुकर देसाई (म्हसवे), विश्वासराव पाटील (शिरोली दुमाला), बाळासाहेब कुपेकर (कानडेवाडी), भीमगोंडा पाटील (शिवारे), शंकर पाटील (शिवारे), अंजना रेडेकर (पेद्रेवाडी), सदाशिवराव नवणे (धामोड), अशोकराव पवार-पाटील (सडोली खालसा), राजेंद्र सूर्यवंशी (कसबा बीड). महिला : संजीवनीदेवी गायकवाड (सुपात्रे), अनुराधा पाटील (सरुड), अर्चना पाटील (कोथळी), हिराबाई पाटील (वाघराळी), जयश्री पाटील (चुये). अनुसूचित जाती/जमाती : चंद्रकांत गवळी (कागल), विलास कांबळे (कारिवडे) इतर मागासवर्गीय : पांडुरंग धुंदरे (राशिवडे), अंबाजी पाटील (येळवडे), शरद पाडळकर (कासारवाडा). भटक्या विमुक्त जाती : पांडुरंग बुवा-चव्हाण (कोथळी), विश्वास जाधव (कोडोली), नानासो हजारे (वाशी).