शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

५२५ साई भक्तांना घडविले शिर्डीत साईदर्शन

By admin | Updated: November 10, 2014 00:50 IST

अनोखी सेवा : ओम साई मित्रमंडळ, मालघरचा उपक्रम

चिपळूण : समाज सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे समजून अनेकजण समाजातील जडणघडणीमध्ये सहभाग घेत असतात. देवाला मानणारेही अनेकजण आहेत. हे नाकारुन चालणार नाही. संगणकीय युगातही देवधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साई भक्तांना साईबाबांचे दर्शन मिळावे, या भावनेतून ओम साई मित्रमंडळ, मालघरचे अध्यक्ष तुुषार खेडेकर यांनी ५२५ साईभक्तांना शिर्डी येथे स्वखर्चाने नेऊन एक अनोखा आनंद मिळवून दिला आहे. कार्तिकी एकादशी, आषाढी आदींसह विविध धार्मिक सणामध्ये पंढरपूर, शिंगणापूर, कोल्हापूर महालक्ष्मी, बालाजी, शिर्डी आदी ठिकाणी जाण्याची परंपरा आजही कोकणाने अखंडपणे कायम ठेवली आहे.अंधश्रद्धा नव्हे; तर श्रद्धेपोटी अनेकजण देवधर्माला अधिक महत्त्व देत असतात. दैनंदिन कामकाजातूनच एखाद्या दिवशी देवदर्शन करुन आत्मिक समाधान मिळावे म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यभरातून विविध प्रांतातील भाविक दररोज येत असतात. या ठिकाणी सार्इंच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगाही लागलेल्या असतात. अशा रांगेत उभे राहून साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय काही भक्त समाधान मानत नाहीत. ओम साई मित्रमंडळ, मालघरचे अध्यक्ष तुषार खेडेकर हे अवघे २५ वर्षांचे असून, ते सार्इंचे भक्त आहेत. छोटा व्यवसाय सांभाळून वेळ मिळेल तेव्हा ते साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.आपल्याबरोबरच अनेकांना सार्इंचे दर्शन घेण्याची इच्छा असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे काहींना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. ही जाणीव ठेवून खेडेकर यांनी शिरळ, मालघर, कोंढे, भोम, भागाडी, रामपूर, देवखेरकी, दोणवली, गुहागर तालुक्यातील पोमेंडी, धोपावे, धामापूर, तरवली आदी ग्रामीण भागातील ५२५ साईभक्तांना स्वखर्चाने शिर्डी येथे सार्इंच्या दर्शनास नेले. या ठिकाणी सर्व भक्तगणांनी तल्लीन होऊन साईबाबांचे दर्शन घेतले. ओम साई मित्रमंडळ, मालघरने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. (वार्ताहर)पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून मालघर येथे वृक्षारोपण करणे, सुंदर बाग, वृक्षसंवर्धन त्याचबरोबर स्वच्छतेवरही अधिक भर देणार असल्याचे तुषार खेडेकर यांनी सांगितले.