शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

५०० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 22, 2014 22:50 IST

शेतकरी हवालदिल : गटसचिवांच्या संपाचा परिणाम

महेश आठल्ये - म्हासुर्लीग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या विकास सेवा संस्थांचे कामकाज गटसचिवांच्या संपामुळे गेले ४५ दिवस ठप्प झाले असून, सुमारे ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संपामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरीक्षण, कर्ज वाटप, आदी कामे थांबली असून, सरकार दरबारी मात्र या संपास बेदखल केले आहे. हा संप मिटणार तरी कधी, असा सवाल आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी विकास सेवा संस्थांची स्थापना करण्यात आली. कालांतराने याच सेवा संस्था मुख्य आर्थिक कणा ठरल्या. जिल्ह्यात सुमारे १७२० सेवा संस्था असून, १३०० सचिव संपावर गेले आहेत. शासकीय धोरणानुसार सध्या शून्य टक्के दराने कर्जपुरवठा शेतकऱ्यांना केला जात असून, कर्जवाटपाची पद्धत त्रिस्तरीय आहे. तीन लाखांपर्यंत बिनव्याजी, तर त्यावरील कर्ज दोन टक्के व्याजाने मुदत फेडीसाठी दिले जाते. त्यामुळे सेवा संस्थांना नफा राहत नाही. मिळणाऱ्या व्याजापोटी खर्चाचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश संस्था तोट्यात आहेत. त्यातच अपात्र कर्जमाफीमुळे बहुतांश संस्था डबघाईला आल्या आहेत. परिणामी गेले तब्बल ४५ दिवस गटसचिव संपावर गेले आहेत. सध्या जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून, शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. त्यासाठी त्यास खते, बियाणे, मशागतीसाठी आर्थिक गरज असून, व्यवहार ठप्प असल्याने त्यास सावकाराचे दार ठोठावे लागणार आले. कर्जपुरवठा बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, तो संप मिटण्याकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, सरकार या प्रश्नावर तोडगा काढण्यास चालढकल करीत आहे. परिणामी सर्वसाधारण सभा, त्यासाठी अहवाल व ताळेबंद तयार करून १५ आॅगस्टपर्यंत घेणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षण करून घेणे व इतर कामे संपामुळे ठप्प आहेत. सचिवही पगार नसल्याने वाढत्या खर्चाच्या प्रश्नामुळे हवालदिल बनले असून, योग्य तोडगा काढून संप मिटण्याकडे डोळे लावून बसले आहेत. ----राज्यातील विकास संस्थांच्या गटसचिवांना तीन टक्के सानुग्रह अनुदान द्यावे. ग्रामसेवकांप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे; पण शासन दरबारी हा संप बेदखल केला आहे. निव्वळ चर्चा करण्यासाठी मुदती देऊन टोलवत ठेवले आहे..