शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘महारेरां’तर्गत राज्यात ५०० विकसकांना दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:23 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘महारेरा’अंतर्गत चालू बांधकामांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैला संपली. राज्यभरातील विकसकांना एकच नियमावली लागू करून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हा ‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट) राज्य सरकारने लागू केला. मुदतीत राज्यभरातून ११ हजार प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये कोल्हापुरातून १८० प्रकल्पांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘महारेरा’अंतर्गत चालू बांधकामांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैला संपली. राज्यभरातील विकसकांना एकच नियमावली लागू करून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हा ‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट) राज्य सरकारने लागू केला. मुदतीत राज्यभरातून ११ हजार प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये कोल्हापुरातून १८० प्रकल्पांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ९० जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. आता उशिराने नोंदणीसाठी अर्ज केलेल्या राज्यातील सुमारे ५०० विकसकांना सुमारे ५० हजार रुपये दंडाच्या नोटिसा लागू केल्या आहेत, पण यातील काही तांत्रिक अडचणीमुळे नोटिसा निघाल्या आहेत.‘महारेरा’ कायद्यानुसार ‘महारेरा’त नोंदणी असल्याशिवाय कुठल्याच प्रकल्पातील घरांची विक्री विकसकांना करता येणार नाही. ज्या बांधकाम प्रकल्पांना भोगवटापत्र मिळालेले नाही, अशांसाठी ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १२ वाजेपर्यंत ‘महारेरा’ अंतर्गत नोंदणी अर्ज करणे बंधनकारक होते.अखेरच्या तीन दिवसांत राज्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी अर्ज आॅनलाईन दाखल झाले होते; पण त्यामध्ये अखेरच्या दिवशी (३१ जुलै) नोंदणी अर्ज दाखल केलेल्यांनाही बँकेतील तांत्रिक अडचणींचा फटका बसला आहे. या ‘रेरा’ अंतर्गत विकासकांवरही आता ग्राहकाभिमुख योजना राबविण्यासाठीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे गृहप्रकल्प साकारताना ग्राहकांशी करारबद्ध केलेल्या सर्व सुविधा द्याव्या लागणार आहेत.आता १ व २ आॅगस्ट रोजी नोंदणी केलेल्या प्रकल्पाच्या विकसकाला ५० हजार रुपये दंड आणि नोंदणीशुल्क अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तूर्त उशिरा नोंदणीसाठी अर्ज दाखलकेलेल्यांना शासनाच्या ‘रेरा’ अंतर्गत नोटिसांमुळे विकसकांची झोप पुरती उडाली आहे.१७ आॅगस्टनंतर नोंदणी अर्जावर विचार३ ते १६ आॅगस्टदरम्यान नोंदणी करणाºया प्र्रकल्पाच्या विकसकाला १० टक्के दंड अपेक्षित असताना एक लाख रुपये दंड किंवा नोंदणी शुल्क यापैकी जास्त असणारी रक्कम आणि नोंदणी शुल्क अशी दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. तसेच १७ आॅगस्टनंतर नोंदणीसाठी येणाºया विकसकाच्या नोंदणी अर्जाबाबत नंतर विचार केला जाणार आहे.‘महारेरा’ची लिंक अजूनही ओपनच‘महारेरा’तर्फे चालू बांधकाम प्रकल्पांसाठी नोंदणी करण्याची लिंक अजूनही बंद करण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विवरणपत्रांसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या धर्तीवर ‘महारेरां’तर्गत नोंदणीसाठी एक महिन्याची वाढ द्यावी, अशी मागणी ‘क्रिडाई महाराष्टÑ’ने केली होती. ही मुदतवाढ दिली असती तर ग्राहकांनाही ‘रेरा’चे संरक्षक कवच मिळाले असते; पण ही मुदतवाढ देण्यात आली नसली तरीही दंडात्मक कारवाई करून नोंदणी सुरू ठेवली आहे.दोन दिवसांत राज्यभरात ४८० नोंदणी अर्जआता १ व २ आॅगस्ट या उशिराने नोंदणी केलेल्या प्रकल्पाच्या विकसकाला ५० हजार रुपये दंड आणि नोंदणी शुल्क अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातून सुमारे ४८० अर्ज ‘महारेरा’कडे दाखल झाल्याची नोंद आहे.