शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अवजारे पुरविणारी ५० वर्षांची सेवा

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

ओटवणेतील साई केंद्र : शेतकऱ्यांची धांदल; आज पारंपारिकतेलाच महत्त्व

महेश चव्हाण - ओटवणेमान्सूनची बरसात वाढू लागल्याने आता शेतकरी शेती मशागतीच्या कामात मग्न झाला आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे निर्माण करणाऱ्या कार्यशाळा गजबजू लागल्या आहेत. शेतीसाठी लागणारे नांगर, जोत (जू), पान, फावडे, कुदळ आदी विविध अवजारांसाठी कार्यशाळेत रांग वाढू लागली आहे. ओटवणे येथील कै. गंगाराम मेस्त्री, कै. अनंत मेस्त्री यांच्या प्रेरणेने उभी राहिलेली ‘साई छाया कला केंद्र, ओटवणे’ ही कार्यशाळा ५० वर्षांहून अधिक काळ शेती अवजारे बनवित आहे. मूर्तिकार आणि हस्तकारागीर चंद्रकांत मेस्त्री, शरद मेस्त्री आणि आनंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ही कार्यशाळा अविरत कार्यरत आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच शेतकऱ्यांना शेती अवजारे पुरवित आहे. सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीचा शेतीत वापर करीत असला, तरी ग्रामीण भागात मात्र हव्या त्या प्रमाणात ट्रॅक्टरने या अवजारांची जागा हस्तगत केली नाही. याचे कारण म्हणजे या अवजारांचा दर्जा आणि सिद्धहस्त कारागीर हे आहे. ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी बारा बलुतेदार पद्धती सुरू होती. काही गावांमध्ये तर अजूनही तुरळक प्रमाणात ही पद्धती सुरू आहे. त्यातील एक गाव म्हणजे ओटवणे आणि येथील मेस्त्री घराण्याची शाळा म्हणजे याचे मूर्तिमंत उदाहरण होय. पैशांऐवजी आजही धान्यचगेली ५० वर्षे ही कार्यशाळा ओटवणे-गावठणवाडी येथे कार्यरत आहे. या शाळेतून शेतीची अवजारे घेऊन जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी मोबदल्यात पैशांऐवजी धान्य देण्याची जुनी परंपरा आजही कायम राखली आहे आणि शाळेतील कारागीरही या पद्धतीचा पारंपरिक वारशाने स्वीकार करतात. केवळ ओटवणेतीलच नव्हे, तर पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी याच कार्यशाळेत शेतीच्या अवजारांची खरेदी आणि दुरुस्ती करून घेतात. पारंपरिक अवजारांना मागणी जरी आजच्या परिस्थितीत ट्रॅक्टरसारख्या यंत्रांनी शेती केली जात असली, तरी कोकणातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिक अवजारांना मोठी मागणी आहे. याचे कारण म्हणजे या भागात सामूहिक पद्धतीने शेती फारच कमी प्रमाणात केली जाते. तसेच येथील छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांवर ट्रॅक्टरने शेती करणे महाग ठरत असल्याने आजही बैलांची खिल्लारी जोडी आणि पारंपरिक अवजारांनाच शेतकरी पसंती देतात.