शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या मंजुरीसाठी घेतले ५० हजार --स्थायी समिती सभा

By admin | Updated: November 22, 2014 00:02 IST

सुभाष रामुगडेंचा आरोप : शिक्षण विभागाचे निघाले वाभाडे

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील भांबुरे नावाच्या कर्मचाऱ्याने जुनी मोरे कॉलनीतील छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेस ना-हरकत दाखला देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले आहेत. याबाबतचे सबळ पुरावे आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्यानेच ही खाबुगिरी सुरू आहे. संबंधितांवर फौजदारीसह कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. रामुगडे यांच्या आरोपामुळे प्रशासनाची बोलतीच बंद झाली. अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते.प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. किल्लेदार स्थायी बैठकीला उपस्थित राहत नाहीत. तीन महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले? फक्त सही करण्यासाठीच ते नोकरीवर येतात काय? असा सवाल राजेश लाटकर यांनी उपस्थित केला. प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश सभापती चव्हाण यांनी दिले.‘नगरोत्थान’ची बिले वेळेत अदा न केल्याने त्याचा कामावर परिणाम होत आहे. साळोखेनगर येथे परवानगी न घेता केलेल्या खुदाईसाठी संबंधित कंपनीवर कारवाई करा. आरोग्य विभागाच्या कचरा उठाव करणाऱ्या गाड्या त्वरित दुरुस्त करा. शहराचा व्याप व परिसर मोठा असूनही महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. नवीन आस्थापनांवरील पदे निर्माण करून नोकरभरती करा. टाकाळा लॅँड फिल्ड साईटचे काम दर्जेदार होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)