शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

औद्योेगिक वसाहतींना ५० लाखांचा निधी देणार

By admin | Updated: October 27, 2016 00:37 IST

स्थायी समितीचा निर्णय : लवकरच कामे सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात सिक्युरिटी आॅडिटकरिता राखून ठेवलेल्या एक कोटी रुपयांपैकी ५० लाख रुपयांचा निधी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. अंदाजपत्रकात फेरबदल करून सुधारित प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवून करावयाच्या कामांना मंजुरी घ्यावी आणि तातडीने कामांना सुरुवात करावी, अशा सूचनाही स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. गुरुवारी (दि. २०) झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत औद्योगिक वसाहतींमध्ये सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असून, गेल्या पाच वर्षांत कसलाही निधी खर्च झालेला नाही, म्हणून प्रशासनास धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘तुम्ही तरतूद का केली नाही?’ असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत अजित ठाणेकर यांनी सिक्युरिटी आॅडिटसाठी एक कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हे काम तीन लाखांत होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात फेरबदल करून त्यातील ५० लाखांचा निधी हा औद्योगिक वसाहतींत सुविधा देण्यावर, तर उर्वरित निधी हा सार्वजनिक शौचालयांवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर ही सूचना मान्य करून तसे प्रस्ताव तयार करण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वर्कशॉपचे माजी प्रमुख एम. डी. सावंत याच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी झाली असून, त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत; तथापि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याकरिता विद्यापीठाचे अधिकारी नेमले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सभेत झालेल्या चर्चेत रिना कांबळे, रूपाराणी निकम, निलोफर आजरेकर, उमा इंगळे, शोभा बोंद्रे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)दिव्यांगांना लवकरच केबिन वाटप दिव्यांग व्यक्तींना केबिनसाठी दोन-तीन जागा निश्चित झाल्या नसल्याने केबिनचे वाटप करण्यात आले नव्हते. आता जागा अंतिमरीत्या निश्चित झाल्यामुळे लवकरच त्यांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती सभेत देण्यात आली. याबाबत रिना कांबळे व मेहजबीन सुभेदार यांनी प्रश्न विचारला होता. रक मेचा गैरवापर उघडकीस आणलावर्कशॉप विभागातील एका कर्मचाऱ्याने महापालिकेच्या सात ते आठ लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत अजित ठाणेकर, सत्यजित कदम, जयश्री चव्हाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यासह त्याला तसलमात देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी खुलासा करताना अधिकाऱ्यांनी असा गैरवापर झाल्याचे मान्य केले. कारवाई करण्याचा तसेच पैसेवसुलीचा प्रस्ताव आयुक्तांकडे देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत आहेत का, अशी ठाणेकरांनी विचारणा केली. शेवटी सभापती जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.