शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामा देवस्थानासाठी ५० लाखांचा रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:02 IST

वाघापूर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश धनगर समाज यांच्याकडून श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामा देवस्थानास ५० लाख रुपये किमतीचा रथ ...

वाघापूर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश धनगर समाज यांच्याकडून श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामा देवस्थानास ५० लाख रुपये किमतीचा रथ भक्तिभावे अर्पण करण्यात आला. तसेच १२५ किलो चांदीची बाळूमामांची मूर्तीही अर्पण करण्यात येणार आहे. आदमापूर येथे रथाचे आगमन झाल्यानंतर देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, तसेच अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.हा रथ बनविण्यासाठी राजस्थानमध्ये १५ कारागीर दोन वर्षे अविरतपणे काम करीत होते. हा रथ बैलांनी, घोड्यांनी तसेच वाहनाने अथवा मनुष्यबळाच्या ताकदीनेही सहज ओढता येईल, अशी रचना केली आहे. या रथावर बाळूमामांचे पशू -पक्ष्यांवरील प्रेम लक्षात घेऊन रथावर मेंढ्या, शेळी, बकरा, घोडा, हत्ती, कुत्रा, हंस, आदींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. या रथाच्या चारही बाजूंवर बाळूमामांच्या प्रतिकृतीमागोमाग कुत्रे, शेळी, मेंढी यांच्या रेखीव प्रतिकृती तयार केल्या आहेत. हा रथ पूर्णपणे सागवान लाकडापासून बनविला आहे. रथासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील धनगर समाज बांधवांकडून ५० लाख रुपये भक्तिभावे संकलित केले आहेत. बाळूमामा बग्गा नं २ चे कारभारी विष्णू गणपतराव गायकवाड (बापूमामा पिंपरीकर) यांनी याकामी पुढाकार घेतला. यशप्रभा आर्टस या कंपनीद्वारे हा रथ तयार करण्यात आला आहे. आदमापूर येथे हा रथ आल्यापासून पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.या रथाच्या पूजनप्रसंगी राजस्थान व मध्य प्रदेशमधून आलेले दलपतराज ताराचंदजी मंडोरा, यशवंत भाई, तानुहारी नानोहर, सुभाष कोळपे, नारायण कारंडे, तुळसराम गोईकर, सुभाष सरोदे, अरुण गोराणे, निसार महमद दिल्लीवाले, आदित्यराज, प्रीतमराज यांचा देवस्थान मंडळाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिनकरराव कांबळे, संभाजीराव भोसले, नामदेव पाटील, साताप्पा पाटील, दयानंद खतकर, राजेश कांबळे, बाळूमामा देवालयाचे मॅनेजर शंकर कुदळे उपस्थित होते.