कोल्हापूर : जैन युवा मंच आयोजित व अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराथी समाज महासंघ, जैन सोशल ग्रुप्स परिवार (युवा, मेन्स, सिल्वर लीफ, मिड टाउन, एव्हर ग्रीन), जितो कोल्हापूर चॅप्टर व जायंट्स ग्रुप (प्राईड) यांच्यातर्फे झालेल्या रक्तदान शिबिरात ५० बाटल्या रक्त संकलन झाले. राजारामपुरीतील जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.
जैन युवा मंचचे अध्यक्ष संकल्प विक्रांत मेहता यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कोविड काळातील रक्तदानाचा उद्देश सांगितला. सर्वच सहकाऱ्यांनी रक्तदानात मोठा सहभाग नोंदविला.
यावेळी महासंघाचे राजेन्द्रभाई शहा, युवा मंचचे प्रशांत शहा, हर्षद दलाल, कोल्हापूर शहर महिला शाखा समिती प्रमुख पूनम शहा, सेक्रेटरी सरिता शहा, जितोचे कुमारभाई राठोड, विविध जैन सोशल ग्रुप्सचे आनंद शहा, रामणभाई संघवी, चंदुभाई ओसवाल, रज्जुबेन ओसवाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज शहा यांनी केले. आगम शहा यांनी आभार मानले.
फोटो 06052021-कोल- ब्लड
फोटो ओळ : कोल्हापुरात जैन मंचच्या आयोजनाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.