शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाच पदाधिकाऱ्यांना अपात्रतेचा धोका

By admin | Updated: October 9, 2015 01:02 IST

टांगती तलवार : जातीचा बोगस दाखला, लाचप्रकरण, अवैध बांधकाम प्रकरणात अडकलेल्या पाच विद्यमान नगरसेवकांसमोर अडचणी

कोल्हापूर : जातीचा बोगस दाखला, लाचप्रकरण आणि अवैध बांधकाम प्रकरणात अडकलेल्या पाच विद्यमान नगरसेवकांना यंदाची निवडणूक लढविण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. माजी महापौर तृप्ती माळवी, सचिन चव्हाण, आदिल फरास यांच्यासह दिलीप पोवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी हरकती आल्यास या नगरसेवकांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, अशा लेखी सूचना मुख्य निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिल्या आहेत. सन २०१० ते २०१५ या सभागृहातील माजी महापौर तृप्ती माळवी, काँग्रेस नगरसेवक सचिन चव्हाण, दिगंबर फराकटे, सरस्वती दिलीप पोवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांनी यंदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तृप्ती माळवी या लाच स्वीकारताना सापडल्या असून त्यांचे नगरसेवकपद राज्य सरकारने रद्द केले आहे. सचिन चव्हाण व आदिल फरास यांचे जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले आहेत. जातीचे दाखले जप्त करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत; परंतु त्यांनी या कारवाईस न्यायालयातून स्थगिती मिळविल्याचे कोणतेही आदेश मनपा प्रशासनाकडे आलेले नाहीत.नगरसेविका सरस्वती पोवार यांनी कनाननगर परिसरात अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे म्हणून प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला होता परंतु तो महासभेने नामंजूर करून त्यांना अभय दिले होते. प्रशासनाने मात्र तो मान्य केलेला नसून महासभेचा निर्णय आणि आयुक्तांचा अभिप्राय राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. त्यामुळे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अनधिकृत बांधकामात जर एखाद्या नगरसेवकाचा हात असेल तर त्याच्या पत्नीला अथवा पतीला निवडणूक लढविता येत नाही, अशी तरतूद बीपीएमसी अ‍ॅक्टमध्ये आहे.नगरसेविका रेखा आवळे यांचा जातीचा दाखलही अवैध ठरविला असून त्यावर न्यायालयाकडून स्थगिती मिळविलेली नाही. दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपदही अन्य कारणाने रद्द ठरविण्यात आले आहे. तथापि आवळे व फराकटे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे परंतु सचिन चव्हाण, आदिल फरास, दिलीप पोवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अडचणी येणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना या सर्व नगरसेवकांची नावे आणि त्यांच्यावरील कारवाईची माहिती देऊन त्यांच्या उमेदवारी अर्जावर काही हरकती आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे लेखी आदेश दिले आहेत. सचिन चव्हाण व दिलीप पोवार यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जावर कोणी हरकत घेतलीच तर मात्र वकिलांमार्फत युक्तिवाद करावा लागणार आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या उमेदवारी अर्जावर निर्णय घेतील. दरम्यान, कुणी हरकत घेवू नये, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)हरकतींवर अवलंबून : छाननीची प्रतीक्षामाजी महापौर तृप्ती माळवी, सचिन चव्हाण, आदिल फरास, दिलीप पोवार, दिगंबर फराकटे यांच्या उमेदवारींवर टांगती तलवार असून, छाननीवेळी हरकती आल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार