शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंगमध्ये

By admin | Updated: April 26, 2015 00:59 IST

सर्वजण सुखरुप : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची माहिती

कोल्हापूर : उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेपाळ तसेच मुंबई मंत्रालय येथे संपर्क साधून कोल्हापूरहून नेपाळला कोणी गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. नेपाळ येथे शक्तिशाली भूकंप होऊन पाचशेहून अधिक लोक मृत झाल्याचे वृत्त कोल्हापुरात पोहोचताच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने या अनुषंगाने कोल्हापुरातून कोणी पर्यटक नेपाळला गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरूकेले. तथापि, भूकंप झाला त्यावेळी कोल्हापूरचे कोणीही पर्यटक नेपाळमध्ये नव्हते; परंतु काही पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे असल्याची माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधून ते सर्व सुखरूप असल्याची खात्री करून घेतली. समर्थ हॉलिडेजतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सुमारे चाळीस जणांची एक सहल बुधवारी रात्री कोल्हापूरहून सिक्कीमला गेली आहे. हे सर्वजण एका खासगी कंपनीचे डिलर्स आहेत. या सहलीचे समन्वयक कृ ष्णात तोडकर यांनी आम्ही सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. गंगटोक, कोलकाता करून ही सर्व मंडळी १ मे पर्यंत कोल्हापूरला पोहोचणार आहेत. कोल्हापुरातील डॉ. नंदकुमार जोशी, त्यांच्या पत्नी मृणाली जोशी, डॉ. मिलिंद जोशी यांच्यासह आठजण नेपाळला जाणार होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. सध्या ही मंडळी सिक्कीममध्ये पोहोचली असून, सर्व सुखरूप आहेत, असे आपत्ती व्यवस्थापनकडून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाची तत्परता नेपाळ येथील भूकंपाची माहिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होऊ लागताच कोल्हापूरहून कोणी पर्यटनासाठी गेले आहे का, याची चौकशी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शहरातील सर्व पर्यटन कंपन्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई मंत्रालयाशी तसेच नेपाळ येथील हेल्पलाईनवरही संपर्क साधून कोल्हापूरचे कोणी पर्यटक आहेत का याची माहिती घेतली आहे. सायंकाळपर्यंत तरी कसलीच माहिती मिळाली नव्हती. जिल्ह्णातील सर्व प्रांत व तहसीलदारांना माहिती मिळवावी, अशा सूचना दिल्या आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींची माहिती कळवा : जिल्हाधिकारी कोल्हापूर : नेपाळ व उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्णातील व्यक्तींची माहिती संबंधित तहसीलदार तसेच जिल्हा नियंत्रण कक्षात द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी केले. जिल्ह्णातील पर्यटक व्यक्ती नेपाळ व उत्तर भारतात गेले असल्यास त्या व्यक्तीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक-०२३१-२६५९२३२) व ‘१०७७’ या टोल फ्री क्रमांकावर तसेच तहसील कार्यालय येथे द्यावी, असे आवाहन डॉ. सैनी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग येथील ‘०२२२-२२०२७९९०’ या क्रमांकावर पर्यटकांच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानेही केले आहे.