शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४७० बिनकामाच्या सहकारी संस्था

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

सर्वेक्षण अंतिम टप्प्यात : आणखी चारशे संस्थांची होणार तपासणी, अनेक संस्था अवसायनात जाणार

सांगली : केवळ कागदोपत्री असलेल्या, बंद असलेल्या व कोणतेही काम न करणाऱ्या सहकारी संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली असून, आजवर झालेल्या सर्वेक्षणातून तब्बल ४७0 बिनकामाच्या संस्था आढळल्या आहेत. या सर्व संस्था अवसायनात काढून त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांनी दिलेल्या आदेशानुसार १ जुलैपासून सर्वेक्षण मोहीम सुरू झाली. ३१ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षणाची मुदत होती. तत्पूर्वीच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्यामुळे मुदतीपूर्वीच सर्वेक्षण संपणार आहे. आजअखेर ८९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित कामही येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे. अजून ४०० संस्थांचे सर्वेक्षण बाकी आहे. बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबत खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार अशा संस्थांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. कृषी बँका, कृषी पतसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणन संस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, दूध संस्था, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन संस्था, ग्राहक भांडारे, गृहनिर्माण संस्था, कामगार कंत्राटदार संस्था अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. अनेक सहकारी संस्थांची नावे शासकीय दफ्तरी नोंद असली तरी, प्रत्यक्षात त्या पत्त्यावर या संस्था अस्तित्वात नाहीत. काही संस्था केवळ कागदोपत्री जिवंत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांची गर्दी कागदोपत्री मोठी दिसत आहे.नव्या मोहिमेनंतर आता सुस्थितीत असलेल्याच सहकारी संस्था कागदोपत्री व प्रत्यक्षात जिवंत राहतील. उर्वरित अनेक संस्था आता अवसायनात काढल्या जाणार असून, त्यांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. (प्रतिनिधी)मिरज तालुक्यात सर्वाधिक बंद संस्थासंपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक बंद असलेल्या सहकारी संस्था मिरज तालुक्यात आढळल्या आहेत. जवळपास साडेतीनशे संस्था याठिकाणी आढळून आल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्याचाही सर्व्हे पूर्ण झाला आहे. येत्या महिनाअखेर मोहीम पूर्ण होणार असून, त्यानंतर तालुकानिहाय बिनकामाच्या सहकारी संस्थांची यादी तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४00 सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे काम राहिले आहे. तेसुद्धा येत्या काही दिवसात संपणार आहे. यातील बहुतांश सहकारी संस्था बंद असण्याची शक्यता आहे. मिरज तालुक्यात सर्वात जास्त संस्था आहेत. सर्वेक्षणाच्या मोहिमेचा विचार केला, तर संपूर्ण राज्यात सर्वात गतीने व शिस्तबद्ध पद्धतीने सांगली जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे.