शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेती पाणीपट्टीची थकबाकी ४६ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:51 IST

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतीसाठी दिलेल्या पाणीपट्टीची थकबाकी वर्षागणिक वाढतच चालली असून, ती आता ४६ कोटी ...

नसिम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतीसाठी दिलेल्या पाणीपट्टीची थकबाकी वर्षागणिक वाढतच चालली असून, ती आता ४६ कोटी ६८ लाखांवर पोहोचली आहे. वसुलीसाठी पाटबंधारे विभागाकडून मोठा गाजावाजा होत असला तरी शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. २० रुपये लिटरने बाटलीबंद पाणी एका बाजूला विकले जात असताना शेतीसाठी मात्र १३ रुपये ८० पैसे प्रतिगुंठा असे वर्षभर पाणी वापरूनही पैसे भरण्यास का टाळाटाळ होतेय, असा प्रश्न वसुली अधिकाऱ्यांना पडला आहे.कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत दक्षिण व उत्तर अशी दोन परिमंडळे करण्यात आली आहेत. दक्षिण परिमंडळात दूधगंगा हा मोठा प्रकल्प; पाटगाव, चिकोत्रा, फाटकवाडी, जंगमहट्टी, जांबरे, चित्री, सर्फनाला, आंबेओहोळ असे मध्यम प्रकल्प व काही लघुप्रकल्पांचा समावेश आहे. उत्तर परिमंडळात राधानगरी, तुळशी, दूधगंगा, वारणा हे चार मोठे प्रकल्प, कडवी, कासारी, कुंभी व धामणी हे चार मध्यम प्रकल्प व २३ लघुप्रकल्पांचा समावेश होतो.‘पाटबंधारे’च्या उत्तर व दक्षिण या दोन्ही परिमंडळांतून जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी पुरविले जाते. दक्षिण विभागाची यावर्षी पाणीपट्टी स्थानिक उपकरासह ६२ कोटी ११ लाखांची आहे. त्यांपैकी २३ कोटी १६ लाख ९१ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. उत्तर विभागातूनही २३ कोटी ५२ लाखांची थकबाकी आहे. दक्षिण विभागात जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींचा समावेश होतो. त्यांची एकत्रित थकबाकी ७२ कोटी १७ लाख आहे. त्यापैकी ११ कोटी ६ लाख ६८ हजारांची वसुली झाली असून उर्वरित रक्कम मार्च २०१८ पासून थकीत आहे. उत्तर विभागातूनही महापालिकेचे २४ कोटी रुपये थकीत असून, त्याचा न्यायालयीन वाद सुरू आहे.1 थकबाकीचा आकडा वाढण्यामागे शेतकºयांची अनास्था जशी कारणीभूत आहे, तशीच ‘पाटबंधारे’तील अधिकाºयांची मानसिकताही कारणीभूत आहे. विशेषत: उत्तर विभागातील अधिकाºयांची मानसिकता कोणालाही न जुमानण्याची असल्याने शेतकरीही पाणीपट्टीसाठी येणाºया वसुली पथकाला मदत करताना दिसत नाहीत.2 या प्रकल्पातून नदी, विहीर, कालवा या ठिकाणांहून लिफ्ट इरिगेशनने पाणी उचलून शेतीला पुरविण्यासाठी शेतकºयांना पाटबंधारे विभागाकडून एकरी ५५२ रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. म्हणजे वर्षाला गुंठ्याला१३ रुपये ८० पैसे इतका दर पडतो.