शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४५३ गावांत कर्जमाफी रेंगाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत जिल्ह्यातून वैयक्तिक ३ लाख ४७ हजार अर्जांची नोंदणी झाली आहे, तर १ लाख ८८ कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु आहे. ज्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाणार आहे. मात्र आता यातील ४५३ गावांसमोर आचारसंहितेची अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असलेल्या या गावांमध्ये चावडी वाचन तूर्त करू नये, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. आचारसंहिता नसलेल्या गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरू होईल. उर्वरित ४५३ गावांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ते होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमधील चावडी वाचनाचे नियोजन जिल्हा उपनिबंधकांमार्फत करण्यात आले होते. आता आचारसंहितेमुळे दोन टप्प्यात चावडी वाचन प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे दिवाळीपर्यंत या गावांमधील शेतकºयांना कर्जमाफी मिळणे मुश्किल होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडूनही शासनाने याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे समजते. तोपर्यंत सहकार विभागाने खबरदारी म्हणून तूर्त ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्येच चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुमारे २ लाख ५७ हजार जण पात्र आहेत. जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार वैयक्तिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ लाख ८८ हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ७६३ सोसायट्या आहेत. लेखापरीक्षकांमार्फत ११८ सोसायट्यांमधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी दहा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने तीन समित्यांची नेमणूक केली आहे. २ आॅक्टोबरपासून चावडी वाचन सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्याला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या समितीवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्याचे, चौकशी करण्याचे काम या समितीतील सदस्य करणार आहेत. तसेच एखादा अर्जदार कर्जमाफीस पात्र आहे की अपात्र आहे, याचा निर्णय ही समिती घेणार आहे.