शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वर्षभरात ४१ जण जाळ्यात

By admin | Updated: January 1, 2016 00:20 IST

लाचलुचपतची कारवाई : माजी महापौरांसह अधिकाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : गत साली लाचलुचत प्रतिबंधक विभागाने माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, आदीं ४१ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून स्वीकारलेली आठ लाख ८४ हजार रुपये लाचेची रक्कम जप्त केली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१५ अखेर ३२ ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यातील सहाजणांनी लाचेची मागणी केली होती. न्यायालयाने दहाजणांना कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी दिली.लाचप्रकरणी जिल्ह्यातील ज्या ४१ जणांवर कारवाई झाली आहे त्यामध्ये १२ पोलीस, ११ महसूल विभागातील लाचखोर, तीन पालिका कर्मचारी यांच्यासह कळंबा मध्यवर्ती कारागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, सहकार, शहर भूमीअभिलेख (सिटी सर्व्हे), एमएसईबी या कार्यालयातील प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन लाखांपासून ते ५०० रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने माजी महापौर तृप्ती माळवी, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे, कळंबा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमराव लादे, सहायक नगर रचनाकार अधिकारी समीर अरविंद जगताप या ‘वर्ग दोन’च्या अधिकाऱ्यांचासह तलाठी, लिपिक, लोकसेवक, खासगी व्यक्त्ािंचा यात सहभाग आहे. तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी यांच्याकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारतेवेळी सापळा रचून पकडण्यात आले होते. हे प्रकरण फारच गाजले होते.सरकारी नोकरदाराने लाच स्वीकारली अथवा लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. त्यामध्ये सर्वाधिक पोलीस व महसूल खात्याशी संबंधित आहेत. या कारवाईतून दहाजणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये महसूल विभागातील तहसील कार्यालयातील लिपीक, तलाठी, भूमीअभिलेख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील कारकून, कोतवाल असे सहाजण तसेच सहायक फौजदार, पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस नाईक अशा पोलीस दलातील तीनजणांना आणि एमएसईबीमधील कनिष्ठ अभियंत्याचा शिक्षेमध्ये समावेश आहे.कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी. २०१६ ला ४० जणांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट आहे.- उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर.२०११ ते २०१५ सापळा केसीसवर्ष खटले २०१११२२०१२१२२०१३१५२०१४३०२०१५३२कारवाई दृष्टिक्षेपातवर्ग एक०१वर्ग दोन०३वर्ग तीन२८वर्ग चार०२ इतर लोकसेवक०१ खासगी व्यक्ती०६ एकूण ४१