पांगिरे : नागणवाडी (ता. भुदरगड) या केवळ एक हजार लोकवस्तीच्या गावात ४१ पिशव्या रक्तसंकलन झाले. महाराष्ट्र राज्य मराठा ऑर्गनायझेशन व जीवन फौंंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लोकमत'च्या महारक्तदान शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गडहिंग्लज येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन गारगोटीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांच्या हस्ते, तर 'लोकमत'चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या हस्ते झाले. अशोकराव साळोखे व तानाजी कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराला सुरुवात झाली.
यावेळी 'लोकमत'चे गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, डॉ. परुळेकर व मयेकर यांची भाषणे झाली. गारगोटी प्रतिनिधी शिवाजी सावंत यांनी स्वागत केले. प्रमोद साळोखे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रमोद साळोखे, सुयोग साळोखे, प्रकाश कदम, प्रमोद साळवी, प्रदीप कदम, सचिन साळोखे, अविनाश साळोखे, गौरव साळोखे, रोहिदास साळवी, प्रशांत कदम, राहुल साळोखे, साईदास साळोखे, उत्तम पालकर, बाबासाहेब इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी ‘लोकमत’चे व्यवस्थापक (इलेक्ट्राॅनिक्स) भैयासाहेब देशमुख, स्टोअर विभागाचे निवृत्ती बामणे, पांगिरे बातमीदार नामदेव पाटील, लायन्स ब्लड बँकेचे डॉ. सुभाष पाटील, जनसंपर्क अधिकारी राजू कुंभार, नीमा देशमुख, आदी उपस्थित होते. पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी वाढदिवसानिमित्त, तर क्रिकेटपटू ऋतुजा देशमुख हिच्यासह पांगिरे, मांगनूर व बामणे येथील युवकांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
फोटो ओळी : नागनवाडी (ता. भुदरगड) येथील शिबिराची सांगता प्रदीप कदम यांच्या रक्तदानाने झाली. यावेळी भुदरगड तालुका राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष अशोकराव साळोखे व मराठा ऑर्गनायझेशन व जीवन फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो क्रमांक : ११०७२०२१-गड-०८