कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांनी कोटितीर्थ येथील मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी वर्ष आणि महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी शासकीय बंधनातून मुक्त केले. या भूखंडावरील बह्ण सत्ता प्रकार नोंद कमी करून क सत्ता प्रकार करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्याचा ८८ मिळकतपत्रिकेवरील ४०० हून अधिक भूखंडधारकांना त्याचा लाभ होणार आहे.करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी याबाबत आदेश दिले. या मिळकती संस्थानिकांकडून मिळाल्या असून १९३७ पासून वहिवाटीस असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्व मिळकतधारकांनी सादर केली आहेत. ज्या मिळकतपत्रिकेवरील मिळकतधारक मृत आहेत, त्यांचे वारसांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शासननिर्णय २० जानेवारी २००९ नुसार, ज्या जमिनी संस्थानिकांनी संस्थानाची सेवा करण्याकरिता परस्पर संबंधितांना दिलेल्या आहेत, अशा जमिनींना चुकून ह्यबह्ण सत्ताप्रकार विहित पद्धतीने कमी करण्याबाबतचे आदेश आहेत.
मातंग वसाहतीतील ४०० भूखंड झाले लोकांच्या मालकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 21:02 IST
kolhapur news, collcator order, people's property छत्रपती शाहू महाराज यांनी कोटितीर्थ येथील मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी वर्ष आणि महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी शासकीय बंधनातून मुक्त केले.
मातंग वसाहतीतील ४०० भूखंड झाले लोकांच्या मालकीचे
ठळक मुद्देमातंग वसाहतीतील ४०० भूखंड झाले लोकांच्या मालकीचेजिल्हाधिकारी देसाई यांचा निर्णय : ब सत्ता प्रकार केला रद्द