शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलींच्या विवाहासाठी ४०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:34 IST

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, ...

ठळक मुद्दे मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जातेसध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत.केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार

कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, त्यांना ४०० उपवरांमधून भावी पतीदेवांची निवड करावी लागणार आहे.मंगळवार पेठेतील ‘बालकल्याण संकुला’मधील संस्थेत नवजात बाळापासून ते अठरा वर्षांपर्यंतची २०० मुले-मुली राहतात. अठरा वयापुढील मुलींसाठी आधारगृह चालविले जाते. सध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत. त्यांपैकी १९ मुली वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत; तर तीन मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी विवाहासाठी तयारी दर्शविली आहे. या तीन मुलींना ४०० अर्जांतून आपल्यासाठी सुयोग्य वराची निवड करावी लागणार आहे.साधारणत: १९८५ साली संस्थेतील पहिल्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर आजपर्यंत ७० मुलींचे विवाह झाले असून, त्या सुखाने संसार करीत आहेत. संस्थेतील किमान तीन-चार मुलींचे वर्षाला विवाह होतात. त्यांचा सगळा खर्च संस्था आणि देणगीदारांतर्फे केला जातो.अशी होते वराची निवड...मुलाने निर्व्यसनी असले पाहिजे, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे, स्वत:चे चांगले घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार हवा, शेती असेल तर उत्तमच; किंवा आणखी काही संपत्ती असणे अपेक्षित आहे. या अपेक्षेनुसार आलेल्या अर्जांमधून मुलीसाठी योग्य ठरू शकतील अशा पाच-सहा मुलांचे अर्ज मुलीला दिले जातात. त्यातून मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळवून मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांकडून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे पदाधिकारी जाऊन मुलाचे घर, परिसर, गाव बघून येतात. त्याला मुलीकडून होकार आला तरच पुढची बोलणी होतात. मुलगा-मुलगीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल, मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे, मुलाचे व आई-वडिलांचे संमतीपत्र व विवाहाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाला पाठविला जातो. त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जाते. 

ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच आहे. तिला स्वयंपाकापासून ते आर्थिक व्यवहार, संसार चालविण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकविल्या जातात.- पद्मजा तिवले, मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल