शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ४० शाळा गळक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या गळक्या व मोडतोड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव करवीर पंचायत समितीकडे पाठविले आहेत. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.तालुक्यात एकूण १७९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या ११२७ इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९५७ इतकी आहे. दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत असताना काही वेळा या गळक्या शाळेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित राहण्यावर होतो. त्यामुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.याबाबत शिंगणापूर येथे नुकतीच करवीर तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीतील चर्चेदरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शाळांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा झाली. त्यात ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची सद्य:परिस्थिती कथन करून या शाळा दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.या शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद स्वनिधी व जिल्हा नियोजन समिती या तीन विभागांकडून निधी प्राप्त होतो. सध्या पंचायतीकडे शाळा दुरुस्तीसाठी ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील सर्व शिक्षा अभियान, मुंबई यांच्याकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतींनी सध्या शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतलेलीआहेत.तालुक्यात सध्या मोडकळीस आलेल्या व २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या, तसेच शिवाजी विद्यापीठाकडून केलेल्या स्ट्रक्चर आॅडिटमध्ये नवीन शाळा उभारण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ११ शाळांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात कोथळी पासार्डे, मांढरे , शिंगणापूर, गांधीनगर या शाळांना मंजुरी मिळाली आहे. तर कन्या उचगाव, कुमार वाशी, माळुंगे, धोंडेवाडी या शाळांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरूआहे.