शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

४० ‘सीसीटीव्ही’तून होणार निगराणी

By admin | Updated: July 3, 2016 00:59 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : अमित सैनी यांच्याकडून पाहणी; ठिकाणांची निश्चिती; २४ लाख ७८ हजारांची तरतूद

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नवीन इमारती आता सुमारे ४० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी पाहणी करून कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित केली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर यापूर्वीच ‘सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली आला आहे. जुन्या इमारतीमध्ये जवळपास १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे कार्यालय येथे हे कॅमेरे आहेत; परंतु दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. दररोज होणारी आंदोलने, कामानिमित्त येणाऱ्या लोकांची लक्षणीय संख्या यांमुळे या इमारतीसह परिसरात ‘सीसीटीव्ही’ची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती. जिल्हाधिकारीहे समितीचे सचिव असल्याने त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन २४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, प्रदीप कदम यांच्यासमवेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांसह जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, रोजगार हमी योजना कार्यालय, महसूल कार्यालय, भूसंपादन कार्यालय, करमणूक कर कार्यालय, नगरपालिका प्रशासन कार्यालय, आदी ठिकाणांची पाहणी केली. कोणत्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे, याची पाहणी करून ती निश्चित करण्यात आली आहेत. वरील कार्यालयांसह जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, त्यांच्या कार्यालयासमोरील खुला पॅसेज, मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती ताराराणी हॉल, नवीन कार्यालयाच्या बेसमेंटमधील पार्किंग, इमारतींमधील जिने, आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी) चौकी कुलूपबंद का ? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार होणारी आंदोलने, आत्मदहनाचे प्रकार, हिंसक आंदोलनांमुळे होणारे प्रशासनाचे नुकसान या पार्श्वभूमीवर परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी जिल्हा प्रशासनाने मंजूर करून घेतली आहे. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीतून ही चौकीही सुटली नाही. चौकीला कुलूप दिसल्यावर बंदोबस्तावरील पोलिसांकडे याबाबत त्यांनी विचारणा केली. येथून पुढे येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना केल्या. तसेच जिल्हा नियोजन कार्यालयापाठीमागे असणारा कचरा लवकरात लवकर उचलून परिसर स्वच्छ करून घ्यावा, अशा सूचनाही संंबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.