शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस खरेदीकर माफीमुळे ३७२ कोटींचा फायदा

By admin | Updated: March 19, 2017 00:34 IST

अर्थसंकल्पातील तरतूद : कारखानदारांना दिलासा

कोल्हापूर : राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अपुऱ्या ऊस उत्पादनाने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागील दोन वर्षांतील उसाच्या उत्पादनाची तुलना केली, तर केवळ ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम जेमतेम दोन महिनेच चालला. उसाच्या तुटवड्यामुळे हंगाम अडखळत चालला. परिणामी, कारखान्यांच्या उत्पादन खर्चात प्रतिटन २५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीतून कारखान्यांना सावरण्यासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगाम २०१५-१६ व २०१६-१७ असा दोन वर्षांचा खरेदीकर माफ केला आहे. मागील हंगामाचा विचार करायचा झाल्यास राज्यात ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले. साधारणत: प्रतिटन १०० रुपये खरेदीकर माफ झाला, तर कारखान्यांना ३७२ कोटींची मदत होणार आहे. यंदाचे साखर उत्पादन व शिल्लक साखरेचा ताळमेळ घातला तर पुरेशी साखर आहे. आगामी काळात साखर आयातीबाबत राज्य सरकारने निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा साखर कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.निर्यातीची अट शिथिलसाखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांचा खरेदीकर माफ करण्याची अट होती; पण अर्थसंकल्पात निर्यातीची अट शिथिल केली असून, त्याचा फायदाही कारखान्यांना होणार आहे.ऊस खरेदीकर माफ करून सरकारने कारखान्यांना दिलासा दिला आहे. सध्या बाजारात साखरेचे दर चांगले आहेत; पण साखर आयातीबाबत सरकारचे धोरण असेच कायम पाहिजे. आयात शुल्क कमी केले तर पुन्हा दरावर परिणाम होईल. - पी. जी. मेढे (साखर तज्ज्ञ) विभागाला दीडशे कोटींचा फायदाकोल्हापूर विभागात यावर्षी एक कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस खरेदीकर माफीचा फायदा विभागाला साधारणत: दीडशे कोटी रुपये होऊ शकतो. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे शंभर कोटी रुपये करमाफीतून मिळू शकतात. सांगली जिल्ह्यात ५० लाख ३४ हजार ४५९ टन गाळप झाला असल्याने सुमारे ५० कोटी रुपयांचा लाभ या जिल्ह्यातील कारखान्यांना होणार आहे.