शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती

By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST

समायोजन सुरळीत : सन २०१३ नुसारच प्रक्रिया पूर्ण; शिक्षक संघटनांचा मात्र विरोध

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने येथील मेन राजाराम हायस्कूल येथे आज, शुक्रवारी शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली. २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन करावे, ही संघटनेची मागणी झुगारून प्रशासनाने ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येनुसार ६७ रिक्त जागांसाठी समायोजन प्रक्रिया राबवली. यावेळी जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे ३७ शिक्षकांनी लेखी दिले. परिणामी, सर्व रिक्त जागा न भरल्याने पुन्हा समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागेल.हक्काचे शिक्षण कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१३च्या पटसंख्येवर आधारित २४ जून २०१४ पासून अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू केली. ती १९ आॅगस्ट २०१४ पर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर अतिरिक्त अध्यापकांची समायोजन प्रक्रिया सुरू झाली. यावेळी शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना ‘अतिरिक्त’च्या प्रक्रियेतून वगळले. मात्र, उपाध्यक्षांना न वगळल्याने एका शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखला केला. यामुळे न्यायालयाने दिलेली समायोजनाची स्थगिती मुंंबई उच्च न्यायालयाने उठविल्यामुळे आज समायोजनाची प्रक्रिया राबविली. आज अतिरिक्त असलेल्या २४२ अध्यापकांना समायोजनासाठी निमंत्रित केले होते.दरम्यान, सहा डोंगराळ तालुक्यांत ८७ रिक्त पदे आहेत. यामधील २०१३ च्या पटसंख्येवर आधारित ६७ रिक्त जागांवर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली. सन २०१३च्या पटसंख्येनुसार रिक्त असलेल्या पूर्ण ६७ रिक्त जागांवरील समायोजन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी २०१४ च्या पटसंख्येवर आधारित समायोजन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.स्थगिती उठवल्यामुळे समायोजनाची प्रक्रिया २०१३ च्या पटसंख्येनुसार पूर्ण केली. समायोजनावेळी ३७ जणांनी पसंतीप्रमाणे शाळा न मिळाल्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यास तयार असल्याचे लेखी दिले आहे. यामुळे रिक्त जागांवर पुढील टप्प्यात समायोजनाची प्रक्रिया राबवण्यात येईल. २०१३ च्या पटसंख्येनुसार समायोजन पूर्ण झाल्यानंतरच २०१४ च्या पटसंख्येनुसार समायोजन होईल.- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी.२०१४ नुसार समायोजनासाठी बेमुदत उपोषणाचा इशाराकोल्हापूर : अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार करावे, या मागणीसाठी गुरुवार (दि. १८) पासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे एका निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षण प्रशासनाला दिला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे सन २०१३-१४ चे प्रतीकात्मक समायोजन करून २०१४-१५ नुसार प्रत्यक्षात समायोजन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना प्राथमिक शिक्षण प्रशासनाने आज, शुक्रवारी २०१३-१४ सालातील समायोजन प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गैरसोयींमुळे ३७ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर जाण्यास पसंती