कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचे चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न करून त्यांना अटकाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ३६ नगरसेवकांना नोटिसा पाठविल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर माळवी या ‘जनता दरबारा’साठी जात असताना या नगरसेवकांनी त्यांचे चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना सुखरुप महापालिकेत पोहोचविले. दरम्यान, माळवी यांनी नगरसेवकांच्या विरोधात फिर्याद पोलिसांत दिली. त्यानुसार गोडसे यांनी शुक्रवारी संबंधित नगरसेवकांना नोटिसा पाठविल्या. त्यामुळे लवकरच नगरसेवकांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
३६ नगरसेवकांना पाठविल्या नोटिसा
By admin | Updated: March 7, 2015 01:02 IST