ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - आधार विद्यालय या निवासी शाळेतील 35 कुपोषित विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कुपोषणाने अत्यवस्थेत असल्याने उपचारांसाठी या मुलांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. शित्तूर तर्फ मलकापूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेची ही शाळा आहे.
प्रत्येक तासाला येथील मुलांची बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी केली जाते. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि डॉ. संगीता कुंभोजकर यांनी या मुलांची तपासणी करतात.
काही दिवसांपूर्वी, शित्तूर येथील गतिमंद निवासी शाळेतील तीन मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत शाळेतील एकूण 35 कुपोषित विद्यार्थी सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. मुलांच्या अंगात रक्त कमी असल्याने त्यांना अशक्तपणा आला आहे.