शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३५ गळक्या शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 10, 2017 01:08 IST

करवीर तालुका : जिल्हा परिषदेस पाठविला प्रस्ताव; १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्तीचे टार्गेट

रमेश पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क --कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जि. प.च्या ३५ गळक्या शाळा सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत करवीर पंचायतीकडून जि. प.ला शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अजून शाळा दुरुस्तीच्या हालचाली सुरू नाहीत.करवीरमध्ये जि. प.च्या सर्वांत जास्त १८३ शाळा आहेत. या शाळेत सुमारे २९ हजारांच्यावर विद्यार्थ्यांची संख्या आहे. बहुतेक शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांच्या संख्येने खचाखच भरलेले असतात; परंतु पावसाळ्यात शाळांचे छत गळू लागले की, या विद्यार्थ्यांचे हाल सुरू होतात. काही वेळा शाळेतील दलदलीमुळे मुले आजारी पडतात. हे प्रत्येक वर्षीचे चित्र आहे. यंदाही अशी स्थिती उद्भवू नये म्हणून करवीर पंचायत समितीने शाळांची दुरुस्ती करून मिळावी म्हणून प्रस्ताव सादर केला आहे.शाळांच्या छताची कौले खराब होणे, काही वेळेला वादळी वाऱ्यांमुळे कौले उडून जाणे, शाळांच्या भिंती कोसळणे, फरशा उखडून पडणे, दरवाजे मोडलेल्या अवस्थेत असणे, अशा प्रकारे शाळांची दुरवस्था होेते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिलेली असते; परंतु त्यातून पुढे काहीही निर्णय होत नसल्याचा शाळांना अनुभव आहे.सध्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा व सर्व शिक्षा अभियानामधून या शाळांची दुरुस्ती व्हावी म्हणून प्रस्ताव केला आहे. त्यासाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये निधीची गरज भासणार असल्याचे समजते. साधारणत: जानेवारी व फेब्रुवारीमध्ये असे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, शाळा दुरुस्त करून मिळाव्यात म्हणून पंचायत समितीकडून पाठविलेले जि. प.कडील प्रस्ताव जिल्हा परिषद जिल्हा नियामक मंडळाकडे पाठवून त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याची माहिती देते. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्यावर शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्येक वर्षी मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होत नसल्याचा अनुभव आहे. प्रस्ताव जास्त, अनुदान कमी शाळा दुरुस्तीसाठी जि. प.कडे तालुक्यातून अनेक प्रस्ताव येतात; परंतु त्या पटीत संबंधित विभागाकडून अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक शाळांची कामे अर्धवट अवस्थेत राहतात.करवीर पंचायतने जि. प.कडे शाळा दुरुस्तीसाठी पाठविलेला प्रस्ताव व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. यंदा कसल्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही.- प्रदीप झांबरे, सभापती, करवीर पंचायत समिती.येत्या १५ जूनपर्यंत शाळा दुरुस्ती करून घ्या, असा आदेश शाळांना दिला आहे. त्यानुसार शाळांची वेळेत दुरुस्ती होईल. निधीची कमतरता भासणार नाही.- राजेंद्र भालेराव, गटविकास अधिकारी, करवीर पंचायत समिती.