शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३२२ उमेदवार पात्र; ५२ अर्ज अवैध

By admin | Updated: March 1, 2016 00:25 IST

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : सात तास छाननी; तिघांच्या अर्जांवर आज निर्णय

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३७७ उमेदवारांनी ४७१ अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल केलेल्या ३७७ उमेदवारांपैकी ३२२ जणांचे अर्ज पात्र, तर ५२ जणांचे अर्ज अवैध ठरले. विद्यमान संचालक अ‍ॅड. विकास पाटील व भैरू पाटील-वाघराळकर यांच्यासह कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांच्या अर्जावरील हरकतीबाबतचा निर्णय आज, मंगळवारी देण्यात येणार आहे. छाननी प्रक्रिया तब्बल सात तास चालली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार आणि सहायक निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील व धनंजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये छाननी झाली. सर्वच पक्ष-गटांतर्फे उमेदवारांची बाजू मांडण्यासाठी निष्णात कायदेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे छाननीसाठी मोठी गर्दी झाली होती. जनता दलाच्या उमेदवारांची बाजू अ‍ॅड. राहुल देसार्इंनी, प्रकाश चव्हाण गटाच्या उमेदवारांची बाजू अ‍ॅड. पी. डी. पोवार यांनी, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बाजू अ‍ॅड. दत्ता राणे यांनी, शहापूरकर गटाच्या उमेदवारांची बाजू अ‍ॅड. लुईस शहा यांनी मांडली. कारखान्यातर्फे अ‍ॅड. रवी तोडकर व अ‍ॅड. संजय देसाई उपस्थित होते. त्यांना अ‍ॅड. विजय मदकरी व दत्ता देसाई यांनी सहकार्य केले.उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिंदे व डॉ. शहापूरकर, संग्रामसिंह नलवडे, संग्रामसिंह कुपेकर, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. स्वाती कोरी, मारुती राक्षे, आदी उपस्थित होते. दिग्गजांचे अर्ज अवैधछाननीत चंदगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, माजी सभापती इकबाल काझी, गडहिंग्लज तालुका संघाचे अध्यक्ष मलगोंडा पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. व्ही. एस. पाटील, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, माजी संचालक प्रा. सुभाष शिरकोळे, भिकाजी दळवी, मल्लाप्पा मंगसुळे, आदी प्रमुख मंडळींचे अर्ज छाननीत अवैध ठरले.तिघांच्या अर्जावर आज निर्णयसहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संचालकपद रद्द केलेल्या अ‍ॅड. विकास पाटील व भैरू पाटील-वाघराळीकर यांच्या अर्जावर माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी, तर जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते व कारखान्याचे कामगार प्रतिनिधी शशिकांत चोथे यांच्या अर्जावर चव्हाण गटाच्या सुभाष चोथेंनी हरकत घेतली. या तिघांच्याही अर्जावर तब्बल तीन तास सुनावणी झाली. मात्र, या संदर्भातील निर्णय आज, मंगळवारी देण्यात येईल, असे निवडणूक अधिकारी पवार यांनी सांगितले.