काळम्मावाडी (ता. राधानगरी ) धरणात ३१ मे अखेर ३२.०३ टक्के म्हणजे ८.१३ टी.एम.सी.इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.गत दोन वर्षांपेक्षाही चालूवर्षी पाणीसाठा अधिक असल्याने दूधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार नसल्याचे चित्र दिसत आहे; मात्र खऱ्या पावसाच्या आगमनाला अद्याप महिन्याचा कालावधी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून दाखल होण्यास उशीर असल्यामुळे पाण्याचे वेळपत्रकाप्रमाणे नियोजन होणे आवश्यक आहे.
जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०)टी.एम.सी ने भरले होते. आज धरणाचा पाणीसाठा ३२.०३टक्के म्हणजे ८.१३ टी.एम.सी.इतका उपलब्ध आहे. गतवर्षी पाणीसाठा ३०.४०टक्के म्हणजे ७.७२ टी.एम.सी.
इतका पाणीसाठा होता. मे २०१९ अखेर १०.९८ म्हणजे २.७९ टीएमसी पाणीसाठा होता.
गतवर्षीच्या तुलनेत हा साठा अधिक असल्याने दूधगंगा नदीकाठावरील गावांना पाणी समस्या भासणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
आज धरणातून दूधगंगा नदीपात्रात -४५० क्युसेक,डावा कालवा २५० क्युसेक असा एकूण ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यावर्षी वादळामुळे मे महिन्यात पाऊस राहिल्याने धरणात पाणी शिल्लक राहिले.
पाऊस सुरू होण्यासाठी अजून विलंब असल्याने वेळापत्रकानुसार उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे.
फोटो कॅप्शन.... मे अखेर काळम्मावाडी धरणात उपलब्ध असणारा ३२.०३टक्के पाणीसाठा .