शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

राज्य शासनाकडून मंजूरी

कोपार्डे : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती पाणी व्यवस्थापनासाठी ३११ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनामधील ठिबक, तुषार सिंचन, पाणी उपयोग आणि वितरण व्यवस्था, दुय्यम साठवणूक निचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबर काटकसरीने पाणी वापर क्षमता वृद्धीवर भर देण्यात येणार आहे. हा निधी २०१४/१५ या वर्षासाठी देण्यात आला आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने निधी देण्यात आला असून, केंद्राकडून २५० कोटी आणि राज्याकडून ६१ कोटी १३ लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीमधून सूक्ष्म सिंचनाखाली एका लाभार्थ्यांस पाच हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करताना पंचायत राज्य संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे, तर लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ५० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक असावेत, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यापैकी ३० टक्के महिला, अनुसूचित जातीमधील १६ आणि ८ टक्के अनुसूचित जमातीमधील असावेत. तसेच या योजनेची सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, सूक्ष्म सिंचनासाठी कमीत कमी २५ टक्के अनुदानाचा वापर पीक क्षेत्रासाठी करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)