शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

चंदगडमधील ३0 ग्रा.पं. सदस्य अडचणीत

By admin | Updated: July 14, 2016 00:41 IST

पायउतार व्हावे लागणार : वर्ष उलटले तरी जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही

चंदगड : चंदगड तालुक्यात जुलै २०१५ मध्ये निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी वर्ष उलटून गेले तरी अद्याप जातवैधता प्रमाणपत्र चंदगड निवडणूक विभागाकडे सादर न केल्याने १८ ग्रामपंचायतींच्या ३० मागास उमेदवारांना निवडून येऊनही पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. याबाबतचा अहवाल तहसीलदार डॉ. सुचिता शिंदे यांनी कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. जुलै २०१५ मध्ये तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये ९८ उमेदवार निवडून आले होते. यामधील ६८ उमेदवारांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले. मात्र, यापैकी ३० उमेदवारांनी वारंवार सूचना, नोटिसा देऊनही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत कोणत्याही मागासवर्गीय उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बधंनकारक असते. मात्र, निवडून आलेल्या ३० उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचे नाव व गाव कंसात - पुंडलिक मष्णू मर्णहोळकर (म्हाळेवाडी), संजय तुकाराम पाटील, अर्चना कृष्णात पाटील (मुगळी/सोनारवाडी), पुणेश्वर लक्ष्मण सुतार (मलतवाडी), संजय भरमू सुतार (हाजगोळी), शांता रामलिंग सुतार (हाजगोळी), बाबू खेमाना कांबळे (हाजगोळी), अनिता संदीप सुतार (माडवळे), साधना शिवाजी कांबळे (माडवळे), मनाली भागोजी सुतार (केरवडे/वाळकुळी), नुसरत बाळासाहेब मुल्ला (कोवाड), सुजाता गोविंद देशमुख (आसगाव), गोपाळ सटुप्पा सुतार (ढोलगरवाडी), अशोक भरमाण्णा राजस (ढोलगरवाडी), दशरथ विष्णू गावडे (पुंद्रा), शांताबाई पांडुरंग नाईक (दाटे), सुरेश मारुती जरळी (दिंडलकोप), रूपाली मारुती नाईक (राजगोळी बुद्रुक), निर्मला दत्तू कांबळे (राजगोळी बुद्रुक), रत्नकांत बाळू गावडे (नागवे), दिलीप गुंडू भोसले (नागवे), निर्मला मोहन गुरव (नागवे), यल्लूबाई इराप्पा नाईक (सुरुते), केदारी कल्लाप्पा कांबळे (सुरुते), लक्ष्मी आनंदा कांबळे (सुरुते), यमुना जकाप्पा सुतार (होसूर), पांडुरंग शिवाजी सुतार (होसूर), कलावती प्रकाश सोनार (बसर्गे), संगीता लक्ष्मी कांबळे (बसर्गे) व तुळसा लक्ष्मण आतवाडकर (कौलगे) यांचा समावेश आहे. नियमांच्या अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास या उमेदवारांची पदे रद्द होऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)