आजरा : आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षांतील उच्चांकी ३०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, तालुक्यातील साळगाव, शेळप, किटवडे, चांदेवाडी, घाटकरवाडी, धनगरमोळा या बंधाऱ्यांवर पाणी आले आहे. चित्री धरण ४५ टक्के भरले आहे. हिरण्यकेशी नदीवरील रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे.
चित्री धरण परिसरात १६६ मि. मी. पावसाची नोंद झाली. किटवडे परिसरात चालू वर्षी जून महिन्यातील उच्चांकी ३०१ मि. मी. पाऊस झाला आहे. आजरा १८१, गवसे १८२, उत्तूर १४२, मलिग्रे १३७ तर सरासरी १६१ मि. मी. पाऊस झाला आहे.
धनगरवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ९३ द.ल.घ.फू.ने भरले आहे. सांडव्यातून पाणी बाहेर सोडले जात आहे. आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्रा नद्या धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार विकास अहीर यांनी केले आहे.
फोटो ओळी : आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील पूर्ण क्षमतेने कोसळणारा रामतीर्थ धबधबा.
क्रमांक : १७०६२०२१-गड-०५