शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी यंत्रमागसाठी ‘टफ’मधून ३० टक्के अनुदान द्यावे : दिल्लीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:01 IST

इचलकरंजी : यंत्रमाग क्षेत्रामध्ये आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होण्यासाठी ‘टफ’ योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी ३० टक्के निधी मिळावा,

ठळक मुद्देपॉवरलूम असोसिएशनची केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे मागणीविजेची बचत करणारी नवतंत्रज्ञानाची मोटार तयार

इचलकरंजी : यंत्रमाग क्षेत्रामध्ये आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होण्यासाठी ‘टफ’ योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी ३० टक्के निधी मिळावा, छोट्या यंत्रमाग कारखान्यांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करू नये, अशा आशयाच्या मागण्या करणारे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्यावतीने केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांना दिले.

नवी दिल्ली येथील उद्योग भवनात देशातील यंत्रमाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संघटनांची एक बैठक केंद्र सरकारने आयोजित केली होती. यंत्रमाग उद्योगामध्ये आधुनिकीकरण व ऊर्जा बचत या विषयासाठी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीवेळी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विजेच्या बचतीसाठी साथी योजनेची माहिती देण्यात आली.

बैठक झाल्यानंतर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, पॉवरलूम डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष पुरुषोत्तम गोयंका यांनी यंत्रमाग क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी आवश्यक असलेल्या सवलतींच्या मागणीचे एक निवेदन राज्यमंत्री टमटा यांना दिले. निवेदनामध्ये, मुद्रा योजनेमध्ये यंत्रमाग उद्योगाचा समावेश करावा. सवलतीच्या दराने वीजपुरवठा करावा. आयात होणाºया कापडावर अ‍ॅँटी डंपिंग ड्युटी वाढवावी. ईपीसीजी योजनेअंतर्गत डिम्ड एक्स्पोर्ट युनिटना योजनेचा लाभ द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनातील मागण्यांचा विचार वस्त्रोद्योग मंत्रालय सहानुभूतीने करेल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.‘साथी’ योजनेत इचलकरंजीचा समावेशनवी दिल्ली येथील उद्योग भवनात यंत्रमाग संघटनांच्या प्रतिनिधींसमोर, यंत्रमागासाठी वापरण्यात येणाºया इलेक्ट्रिक मोटारीची कार्यक्षमता वाढवून विजेची बचत करणारी नवतंत्रज्ञानाची मोटार तयार केली आहे, त्याबाबतची माहिती सांगितली.

त्याचबरोबर यंत्रमाग उद्योगामध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी ‘साथी’ योजनेमार्फत या मोटारी सवलतीच्या दरात पुरविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी ‘साथी’ योजनेसाठी देशातील इचलकरंजी, भिवंडी, सुरत व इरोड या यंत्रमाग केंद्रांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासंदर्भात लवकरच या केंद्रांमध्ये यंत्रमागधारकांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री टमटा यांनी दिली.