शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमधील ३० शाळा गळक्या

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

करवीर पंचायत मासिक सभा : सदस्यांचा आरोप; बांधकाम विभाग धारेवर

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील ३० शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गळक्या शाळेमुळे मुले भिजायला लागली आहेत. बांधकाम विभागाने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव न केल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक सदस्यांनी केला. अध्यक्षस्थानी सभापती दिलीप टिपुगडे होते. गळक्या, मोडकळीस आलेल्या व काही ठिकाणी पडझड झालेल्या तालुक्यातील ३० शाळांची सद्य:स्थिती दर्शवणारे फोटो काढून व ठराव करून मुख्याध्यापकांच्या सहीने पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. हे प्रस्ताव एप्रिल महिन्यात पाठविले असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले नाहीत. त्यामुळे शाळांची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे याचे पडसाद आज, शुक्रवारच्या सभेत उमटले. सभापती टिपुगडे यांनी या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी येत्या चार दिवसांत शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत, अशी सक्त ताकीदच अधिकाऱ्यांना दिली.तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अर्जुन पाटील यांनी उपस्थित केला. अतिरिक्त शिक्षकांना तालुक्यातच ठेवा. कारण येत्या काही महिन्यांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यावेळी जिल्हा परिषदेकडे शिक्षक मागायची वेळ यायला नको. गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी तालुक्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावेत. सभागृह त्यांच्या पाठीशी असेल, असे तानाजी आंग्रे म्हणाले. योग्य निर्णय घेऊन शिक्षण विभागाचे काम चांगल्या प्रकारे केले जाईल, असे आश्वासन यावेळी गटशिक्षण अधिकारी आर. जी. चौगले यांनी दिले. तालुक्यातील ८० टक्के अंगणवाड्यामधील इमारतीचा स्लॅब गळत असून, त्याची दुरुस्ती करावी. तसेच पाचगावमधील काही कॉलनीतील पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. या प्रश्नावर प्रत्येक सदस्याला शाळा, अंगणवाडी व दवाखाना दुरुस्ती यांसाठी ऐच्छिक निधी म्हणून २५ हजार रुपये दिले जातील, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.मजुरांची उपलब्धता केल्यास मनरेगाची कामे त्वरित सुरू केली जातील, असे जिल्हा तक्रार निवारणचे अधिकारी डी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.