शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याजवळ आरामबस कोसळून ३० जखमी

By admin | Updated: February 22, 2016 01:07 IST

सर्वजण मुंबईचे : चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

कोल्हापूर/देवाळे : पन्हाळा पाहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी आरामबस (ट्रॅव्हल्स) बांबरवाडी गावच्या हद्दीत मोठ्या नागमोडी वळणावर झाडाला धडकून सुमारे २५ फूट खोल शेतजमिनीत कोसळून झालेल्या अपघातात चालकासह मुंबईचे तीस प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खासगी प्रवासी बसमधून (एमएच-०४ एफएक्स ४६४९) रविवारी सकाळी मुंबईहून सुमारे ३५ पर्यटक पन्हाळगड येथे आले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले. बांबरवाडी (ता. पन्हाळा) गावाजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याकडील झाडाला धडकून सुमारे २५ फूट खोल शेतजमिनीत कोसळली. यावेळीे मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवासी व ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. रस्त्याकडेला तीव्र उतार असल्याने व अपघातात बसचा चक्काचूर झाल्यांने जखमींना बसमधून बाहेर काढणे मुुश्कील झाले होते. मात्र, येथील ग्रामस्थ, प्रवाशांनी ३० जखमींना बाहेर काढले व त्यांना तत्काळ उपचारासाठी सी.पी.आर.मध्ये दाखल केले. अपघाताची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे. दरम्यान , सीपीआरमध्ये अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात जखमी दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची धांदल उडाली. जादा डॉक्टरांची कुमक मागविण्यात आली. काही जखमी पर्यटकांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती गंभीर असलेल्या पर्यटकांना प्राथमिक उपचार करून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने पालक भेदरून गेले होते. अनेकांच्या डोक्याला, हाता-पायांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. अपघाताचे वृत्त मुंबई येथील जखमींच्या नातेवाइकांना समजताच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींची नावे अशी : ंमंथन महेश घाणेकर (वय ७), साक्षी घाणेकर (२६), वेदा सचिन जडियार (४), संदीप सचिन जडियार (१२), महेश बाबू घाणेकर (३२), रोहिणी रामचंद्र गांगरकर (२२), अनुजा सचिन जडियार (३५), सुनंदा लक्ष्मण पकडे (५५), दीक्षा राजेश घाणेकर (३५), किशोर जनार्दन धुरी (२५), ओमकार रामचंद्र गांगरकर (१६), लक्ष्मण बाबू खोबडे (६५), प्रसाद नामदेव इंदुलकर (४६), योगेश शिगवण इंदुलकर (२८), जान्हवी शिगवण इंदुलकर (२६), प्रेम शिगवण इंदुलकर (४), रोशन प्रभाकर परब (२९, सर्व रा. भांडुप, मुंबई), प्रकाश कृष्णा दिवाळे (३२), लक्ष्मी धोंडू पडे (४५), प्राप्ती प्रकाश दिवाळे (२५), श्रावणी शरद कातकर (२८), शरद रामचंद्र कातकर (३८), सारा शरद कातकर (७), पार्थ शरद कातकर (४), सुशील सोनू जडियार (२८), संजय महादेव दिवाळे (३२), वैशाली तुकाराम उदेक (४८), तुकाराम सोनू उदेक (५०), तेजस तुकाराम गांगरकर (१६, सर्व रा. घाटकोपर, मुंबई).