कोरोना संकटाने नागरिकांना सहा महिने घरी बसून राहायला लावले. गेले दोन महिने अनलॉक झाले असले तरी आर्थिक अडचणींचा फटका इतका मोठा आहे की, अजूनही काही व्यवसाय बंद आहेत. काहींनी गती घेतलेली नाही. अनेकजण बेरोजगार झाले. या कठीण काळात केंद्र शासनाने सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेने गरीब, गरजू कुटुंबांना उपाशी राहू दिले नाही. नागरिकांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ नये यासाठी रेशनवर मोफत धान्य वितरणास सुुरुवात केली. पहिले दोन-तीन महिने केवळ तांदूळ आणि त्यानंतर गहू व शेवटच्या टप्प्यात डाळही मोफत देण्यास सुरुवात केली. याशिवाय कार्डावर तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये किलोने मिळतच होते. अशारीतीने माणसी दहा किलो धान्य एप्रिल ते नोव्हेेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत मिळत होते. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना फार मोठा दिलासा मिळाला.
---
तालुकानिहाय मिळालेले धान्य (मेट्रिक टनमध्ये)
तालुका कार्डांची संख्या तांदूळ गहू डाळ
आजरा : १ लाख ६५ हजार २२० : १ हजार ९९२ : २२ हजार ३४ : २० हजार ८३३
भुदरगड : २ लाख १ हजार ७५९ : २ हजार ४८५ : २६ हजार ८४६ : २५ हजार ५०९
चंदगड : २ लाख ३१ हजार १७७ : २ हजार ८४७ : ३० हजार ८३७ : २९ हजार १४१
गडहिंग्लज : २ लाख ७१ हजार १८० : ३ हाजर १६३ : ३६ हजार ४२ : ३४ हजार १६२
गगनबावडा : ३८ हजार १०७ : ४८० : ५ हजार ९० : ४ हजार ८०१
हातकणंगले : ५ लाख ३१ हजार ८९५ : ७ हजार १८३ : ७१ हजार २९० : ६७ हजार २९०
इचलकरंजी शहर : २ लाख ७२ हजार १७० : ३ हजार ४६० : ३६ हजार ४४६ : ३४ हजार ३१८
कागल : ३ लाख २४ हजार ४५६ : ४ हजार १५८ : ४३ हजार ३०७ : ४० हजार ९८१
करवीर : ५ लाख ७२ हजार ६९७ : ७ हजार २९९ : ७६ हजार ६५८ : ७२ हजार २६५
कोल्हापूर शहर :) ५ लाख ७० हजार १६७ : ६ हजार ५३४ : ७७ हजार १३१ : ७१ हजार २०२
पन्हाळा : ३ लाख ३७ हजार ४३ : ४ हजार ३५३ : ४५ हजार ३४६ : ४२ हजार ४११
राधानगरी : २ लाख ६८ हजार ६९९ : ३ हजार ५२१ : ३६ हजार ५७ : ३३ हजार ९०१
शाहूवाडी : २ लाख २६ हजार ७५२ : २ हजार ८६२ : ३० हजार १९९ : २८ हजार ६०२
शिरोळ : ४ लाख ८० हजार ५७ : ६ हजार १३७ : ६४ हजार ७ : ६० हजार ७५२
एकूण : ४४ लाख ९१ हजार ३७९ : ५६ हजार ४७९ :६ लाख १ हजार २९६ : ५ लाख ६६ हजार १७६
-----
गाडी बंद पडली, धान्यावरच चरितार्थ
माझी रमणमळा परिसरात चहाची गाडी होती. कोरोनामुळे गाडी बंद झाली. या कठीण काळात मोफत धान्यामुळे माझ्या कुटुंबाची उपासमार झाली नाही. अजूनही माझ्या हाताला काम नाही. त्यामुळे पुढे आणखी काही महिने मोफत धान्य मिळाले असते तर बरं झालं असतं.
शंकर काटाळे (कळंबा)
---
मी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. कोरोनापासून हा व्यवसाय बंद आहे. माझ्यासोबत अनेक कामगार काम करतात. मोफत धान्यामुळे इतके दिवस रोजीरोटीचा प्रश्न आला नाही; पण अजूनही व्यवसाय पूर्णत: सुुरू झालेला नाही. पुढील काळाची चिंता आहे.
संदीप जाधव (कोल्हापूर)
--
कोरोनाकाळात रोजगार नव्हता, मोफत धान्य योजनेमुळे हातावरचे पोट असलेले मजूर, शेतकरी, कामगार यांच्या अन्नाची भ्रांत थांबली. लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली नाही. ऑनलाईन प्रणालीमुळे आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवू शकलो.
दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी)
---